पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० [स्तवक 66 असा आणि तें सर्व सोनें ब्राह्मणांना अर्पण केले. त्या रात्रीं राजाचें शरीर तसेंच कायम राहिलें; हें पाहून तर राणीच्या आनंदाला सीमा राहिली नाहीं. नगरांतील लोकांना तें वर्तमान कळल्यावर त्यांनीहि ध्वजापताका उभारून आपला आनंद व्यक्त केला. ती खणलेली विहीर साठ मनुष्येंपर्यंत खोल झाली होती, त्या पाण्यानें येळु राजाच्या एवढ्या भयंकर पातकाचा नाश झाला हें पाहून लोकांना त्या पाण्याची योग्यता महातीर्थाप्रमाणे वाटू लागली. त्या ठिकाणीं पाता- ळांतल्या भोगावतीचें पाणी आलें होतें. तेव्हां त्या तीर्थाने महा पात- कांचा नाश व्हावा यांत मोठेसे आश्चर्य तें काय ? त्या तीर्थाजवळ शंकराचें ज्योतिर्लिंग होतें; त्यावर देऊळ बांधण्याचा नवस माणकावती राणीनें केला होता; तिनें आपल्या पतीला नवसाची गोष्ट कळवून ती आपल्या पतीला ह्मणाली; महाराज ! आपणास आरोग्य प्राप्त झाल्यावर येथें शिवाचें मंदीर बांधीन, व मंदिराचा कळस दिसल्यावांचून अन्नपाणी घेणार नाहीं, मीं नवस केला आहे; तर तुम्हीं देशोदेशींचे कारागीर वोलावून मंदीर बांधण्यास आरंभ करा." राणीने असे सांगितल्यावर राजानें पैठण नांवाच्या शहरांतून कोकु या नावाचा कारागीर बोलाविला, हा कोकु अत्यंत निष्णात कारागीर असून तो विश्वकर्म्याचाच अवतार होता. राजानें पाचारण केल्यावर तो आपणाबरोबर शिल्पविद्या जाणणारे सातशें लोक घेऊन आला, तो "राणीनें आल्यावर राजाने त्याला आपला मनोदय कळवून असें सांगितले की, कळस दिसल्यावांचून अन्न ग्रहण करावयाचें नाहीं असा निश्चय केला आहे, तर काम किती दिवसांनी होईल तें सांग." तेव्हां कोकू हाणाला, “राजा ! जरी आम्हीं रात्रंदिवस काम केले तरी सोळा महिन्यावांचून कळसाचें दर्शन होणार नाहीं, " हैं ऐकून राजा अत्यंत चिंताग्रस्त झाला, मग कोकु ह्मणाला, एवढी काळजी करण्याचे कांहीं कारण नाहीं, मी सात दिवसाचें आंत कळस दाखवितों. असे सांगून त्याने कामाला आरंभ केला. त्या कोकूनें त्या वेळी निराळीच युक्ति केली. दगड चुना वगैरे साहित्य न जमवितां एक पर्वत कोरून सात दिवसाचें आंत मंदीर तयार केलें व माणकावतीला कळस दाखविला. तें महातीर्थ येळु राजाने बांधले हाणून त्याला येळार असें ह्मणतात. " राजा ४ शंकर- भिल्लीण कथा. कथाकल्पतरु. हे जनमेजय राजा ! आतां येळार येथें शिवाचें ज्योतिर्लिंग कसें स्थापन झालें त्याची कथा तुला सांगतों. " कोणे एके समयीं पार्वती व शंकर सोंगट्या खेळत बसले होते, आणि तें खेळणें, पण लावून चाललें होतें. खेळण्यामध्यें पार्वतीचा हात चांगला असल्यामुळे ती बरोबर फांसा टाकून पाहिजे तें दान घेत असे, आणि शंकर कसे तरी फासे टाकीत असल्यामुळे त्यांना इच्छित डाव पडत नसे; यामुळे पार्वती, पणांत शंकराच्या एकेक वस्तु जिंकू लागली. पार्वतीनें शंकराचा