पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रॅ. ] अध्याय १५ वा. १५९ तीं श्वापदें मारल्यावर मी तहानेनें अत्यंत व्याकूळ झाली हाणून पाण्याचा शोध करूं लागलों. मी आपल्या लोकांनाहि पाण्याचा शोध करण्यास सांगितले पण पाणी कोठेंहि दृष्टीस पडलें नाहीं; इतक्यांत माझी दृष्टी जमिनीत गाईचा खूर वठला होता त्याकडे गेली; त्या खूर वठलेल्या जागेत मात्र थोडे पाणी होतें; पाणी कसले ? कांहीं तरी तें होतें, पण मी अगदीं थकलेला असल्यामुळे त्या पाण्यानें कसें तरी हात पाय व तोंड प्रक्षालन केले. पण माणकावती ! तें पाणी जरी चांगलें नाहीं, असें मला वाटलें, तरी त्यानें मी आपले हातपाय प्रक्षालन केल्यावर मला फार समाधान वाटलें." ३ येळारची स्थापना. 66 येळु राजानें ही सांगितलेली हकीकत ऐकून माणकावती राणचे लक्षांत हात, पाय व तोंड हीं तशींच राहण्याचे कारण आले. त्या खुरांतल्या पाण्यानें राजाला स्नान घातल्यास राजाचें सर्व शरीर रात्री तसेंच राहत जाईल असे तिला वाटलें. ती राजाला ह्मणाली; महाराज ! काल आपण ज्या अरण्यांत शिका- रीसाठी गेला होतां व ज्या खुरांतल्या पाण्यानें हातपाय धुतलेत, तें अरण्य व तो खूर पाहण्याची माझी इच्छा आहे, तर मला ते दाखविण्याची तजवीज करावी. " मग राजानें पुन्हां शिकारीची तयारी केली व बरोबर पुष्कळ लोक व राणीला घेऊन तो पूर्व अरण्यांत आला. आणि अरण्यांत आल्यावर राजानें राणीला जमिनींत वठलेला खूर दाखविला; पण त्यांत पाणी नाहीं हें पाहून ती फार निराश झाली; तेव्हां त्या राणीने ती खुराची जागा पाणी लागेपर्यंत खणण्याचा निश्चय केला, व जोपर्यंत पाणी लागणार नाहीं तों- पर्यंत अन्नपाण्यावांचून रहावयाचें असें ठरविलें. त्याप्रमाणे तिनें आपला संकल्प राजाला कळविल्यावर राजानें जमीन खणणारे लोक बोलाविले व त्यांच्या- कडून ती खूराची जागा खणण्यास आरंभ केला. खणतां खणतां पन्नास दिवस झाले, तरी तेथें पाणी ह्मणून लागेना; इकडे राणीची अवस्था तर अगदी कठीण झाली. पन्नास दिवस तिला अन्नपाणी नसल्यामुळे तिचें चर्म व अस्थि फक्त राहिल्या होत्या. " अहो ! त्या राणीची अशी स्थिति झाल्यावर पार्वती महादेवाला ह्मणाली, पतिव्रतेचा आतां किती अंत पाहतां ! तिला तेवढे उदक द्याल तर ती आणि तिचा पति अशी दोघें वांचतील, नाहीं तर ती राणी आतां मरून जाईल " तेव्हां महादेव हाणाले, " पार्वती ! अद्यापि त्या येळू राजाचें पाप संपलें नाहीं. तें संपल्यावांचून मला पाणी देतां येत नाहीं. आणखी दहा दिवसांनी तेथे पाणी लागेल. त्याप्रमाणे इकडे माणकावती राणी खणीत असलेल्या विहिरीला साठावे दिवशीं पाणी लागलें. तें पाणी पाहून राणीला अत्यंत आनंद झाला. तिनें त्या पाण्यानें राजाला स्नान घातलें; ब्राह्मणांना बोलावून राजाची मुवर्णतुला करविली