पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. २ मनुष्याचे जंतु व जंतुचा मनुष्य. , पवित्र त्रिवेणीचें स्नान करून व विष्णु स्मरण करीत त्यानें प्राण सोडल्यामुळे, त्याला नेण्यासाठी विष्णुदूत आले, ते त्या विद्याधराला उचलून विमानांत ठेवू लागले, इतक्यांत यमाचे दूत येऊन ते त्याला यमलोकीं नेऊं लागले, तेव्हां विष्णु दूतांचे व यमदूतांचें भांडण सुरूं झालें व तो तंटा देवलोकीं देवांपुढें गेला. मग देवांनी त्या विद्याधराच्या पापपुण्याचा विचार करून त्याला विचारलें कॉ, “तूं अगोदर पाप भोगतोस की अगोदर पुण्य भोगतोस ?" तेव्हां विद्याधर लणाला, "मला एकाच शरीराला पाप व पुण्य असे भोग द्या." मग देवांनी त्या विद्याधराला मनु नामक राजाच्या उदरीं जन्मास घातलें, तो मनुराजा सोमवंशी होता व अलंजापूर येथें राज्य करीत होता. त्याला जो पुत्र झाला तोच पूर्व जन्मींचा विद्याधर होय. त्या मनुराजानें मुलाचें नाव येळू असें ठेविलें. कांहीं दिवसांनीं त्या येळू राजाचें बालपण संपून त्याला तारुण्य प्राप्त झालें, तेव्हां पुण्य व पातक याची फळें मिळण्यास आरंभ झाला. दिवसा तो राजा सर्व कृत्यें व्यवस्थितपणें करित असे, पण रात्रीं भोजनोत्तर पलंगावर जाऊन निजला ह्मणजे त्याच्या शरिराचे अनंत कृमिकीटक होत असत. प्रथम तो प्रकार बघून राणी अत्यंत विस्मित झाली. त्या वेळीं तिला काय करावें तें सुचेना. तिनें मोराच्या पिसांचा कुंचा घेऊन रात्रभर त्या कृमिकीटकांचे संरक्षण केलें. पुढें प्रभात होऊन सूर्योदय झाल्यावर त्या येळू राजाचें शरीर पूर्ववत् झालें. तो प्रकार पाहिल्यावर त्या राजाची स्त्री माणकावती प्रत्यहीं रात्रीं त्या कृमिकीटकांचें संरक्षण करीत असे. त्या येळु राजाचे आयुष्याचे दिवस अशा कष्टकारक रीतीनें चालले होते. पुढे एके दिवशीं तो शिकार करण्यासाठी एका अरण्यांत गेला; बराच वेळ शि.. कार केल्यावर तो फार दमला व पिण्यासाठी पाण्याचा शोध करूं लागला, तो त्या अरण्यांत चोहोंकडे हिंडला परंतु त्याला पाणी कोठेंहि दिसेना, मग शंक- रास दया आली व त्यांनी पाताळांतून भोगावतीचें पाणी एका गाईच्या खुरांत आणलें, राजानें तें गाईच्या खुरांत थोडेसें दिसत असलेले पाणी पाहून तो तेथें बसला व त्यानें त्या पाण्यानें कसें तरी हात, पाय व तोंड प्रक्षालन केलें; नंतर तो तेथून घरीं आला, व घरी आल्यावर त्यानें आपली तृषा शांत केली. रोजच्याप्रमाणें तो भोजनोत्तर पलंगावर निजल्यावर त्या राजाच्या शरीराचे कृमी कीटक झाले; परंतु हात, पाय व मुख हीं तशींच कायम राहिलीं, तो प्रकार बघून त्या माणकावतीला फार आनंद झाला. सकाळी पति उठल्यावर ती पतीला ह्मणाली, काल आपण शिकारीला गेला होतां तेथें गेल्यावर काय काय हकीकत घडली ती मला सांगावी. तेव्हां राजा ह्मणाला, "काल ज्या अरण्यांत शिकारीसाठी गेलो होतो, त्या अरण्यांत एक दोन श्वापदें मोठ्या कष्टानें मिळालीं; १५८ [ स्तबक