पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक आपल्या कर्त्यासवरत्या विद्याधर पुत्राचे अंगावर सर्व संसार टाकून आपण काशीयात्रेला निघून गेला, तो तिकडेच कैलासवासी झाला. इकडे विद्याधर आपल्या बापाचा व्यवहार पाहण्यासाठी कागदपत्र पाहत असतां, त्यांत त्याला आपली स्वतःची पत्रिका आढळून आली. ती पत्रिका संपूर्ण वाचून पाहिल्यांवर त्याच्या मनाला फार उद्विग्नता उत्पन्न झाली; कारण त्या पत्रिकेंत विद्याधरा- कडून मातृगमन, सुरापान व ब्रह्महत्या हे तीन विलक्षण प्रकार होतील, असे वर्तविलें होतें. अशी चमत्कारिक ती पत्रिका पाहून विद्याधराची स्थिति अगदी वेड्यासारखी झाली; त्या पापभीतीनें त्याचें मन अगदी त्रस्त होऊन गेले व त्यास काय करावें तें सुचेनासे झाले. त्यांपैकी एक गोष्ट जरी हातून झाली, तरी सहस्र वर्षे नरकवास भोगावा लागेल आणि तिन्हीं गोष्टी हातून घडल्यास तीन हजार वर्षे नरकयातना भोगाव्या लागतील, तेव्हां ते प्रकार आपल्या हातून होऊं नयेत ह्मणून काय करावें, अशी त्या विद्याधराला फार काळजी लागली होती. शेवटी त्या पापभीतीनें विद्याधरानें कांहीं द्रव्य बरोबर घेऊन आईचा निरोप घेतला, व दूर देशांतराला निघून गेला. कथाकल्पतरु. कांही दिवसांनीं त्या धनेश्वर ब्राह्मणाची स्त्री दुष्काळांत आपल्या जवळचे सर्व द्रव्य घालवून अगदी निष्कांचन झाली. तिच्याजवळ द्रव्य मुळींच नसल्या- मुळें तिचे खाण्यापिण्यावांचून फार हाल होऊं लागले, तेव्हां तिनेंहि आपला गांव सोडला व पोटासाठी देशोदेश हिंडत हिंडत ज्या देशांत तिचा मुलगा विद्याधर येऊन राहिला होता, त्याच देशांत रेवातीराला असलेल्या एका शह- रांत येऊन राहिली. पोटासाठी तिनें अनेक व्यवसाय केले, परंतु पोट भरेना, ह्मणून शेवटीं ती गणिका झाली, व तो व्यवसाय करूं लागली, एके दिवशी विद्याधराला कामवासना उत्पन्न झाल्यामुळे तो शहरांत फिरत फिरत त्याच गणिकेकडे आला. तेव्हां त्या गणिकेनें त्याचा चांगल्या प्रकारें आदर सत्कार करून त्याला आपल्या घरी रात्रभर ठेवून घेतलें. मध्य- रात्रीचे सुमारास विद्याधराला फार तहान लागली ह्मणून तो अंधारांत मंचकावरून उटला व मंचकाच्या खाली असलेले भांडे घेऊन तें त्यानें तांडाला लावलें, तें चमत्कारिक चवीचें व घाणेरडें वासाचें पाणी पिऊन त्यास अत्यंत खेद उत्पन्न झाला, व तो त्या गणिकेला हें असें वाईट पाणी येथे कशाला ठेवलेंस ह्मणून ह्मणाला. गणिकेनें तें भांडे पाहून ती ह्मणाली, "तुह पाणी न पितां सुरा प्यालांत, या भांड्यांत सुरा होती.” तें त्या गणीकेचें बोलणे ऐकून विद्याधराचे मस्तकावर वज्राघात व्हावा त्याप्रमाणें त्याला दुःख झालें, तो ह्मणाला; जी गोष्ट घडूं नये ह्मणून मी आपले घर पैसा व आई यांचा त्याग केला, ती गोष्ट अशा रीतिनें घडून आली. यावरून दैवांत ब्रह्मदेवानें जें लिहून ठेविले असेल तें कोणाच्यानेंही टाळितां