पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय २ रा. १८ थोडक्याच दिवसांत त्यानें संपूर्ण पृथ्वि जिंकिली व पृथ्वीवरील राजांना आपल्या बंदीशाळेंत आणून ठेविले. त्यानंतर त्यानें अष्टदिशांचे दिक्पाळ व अनेक लोकपाळ यांनां जिंकून बंदीशाळेत आणून ठेविलें. असें करित करित त्यानें आपले सैन्य देवेंद्राची अमरावती घेण्यासहि पाठवून दिले. त्यावेळी स्वतः वज्र- नाभ अमरावतीस गेला व युद्धाला आरंभ होण्याचे पूर्वी इंद्राला भेटून म्हणाला, हे देवेंद्रा ! मी तुझी अमरावती घेण्यासाठी ससैन्य आलो आहे, तर मुका- ट्यानें आपले सर्व राज्य माझ्या स्वाधीन कर, अथवा तसे करण्याची तुझी इच्छा नसल्यास युद्धाला तयार हो. देवेंद्रा, तूं माझा सापत्न बंधु असून आपणा सर्वांचे हक्क सारखेच आहेत, असे असतां तूं अमरावतीचें राज्य करून स्वर्ग- सुखाचा अनुभव घ्यावा व मी पृथ्वीवर मृत्युलोकीं रहावें हें मला मुळींच पसंत नाहीं. आजवर या स्वर्गसुखाचा तूं उपभोग घेतलास पण आतां यापुढें तें सुख मला भोगावयाचे आहे; कारण मी तुझा सापत्न बंधु असल्यामुळे माझाहि त्याच्यावर हक्क आहे, अमरावतीचें राज्य देण्याची तुझी इच्छा नसल्यास तसे तूं मला स्पष्ट सांग, म्हणजे मी आपल्या सैन्याकडून सर्व इंद्रपुरीचा विध्वंस करून टाकतों. " वज्रनाभाची ती विलक्षण मागणी ऐकून व त्याचें तें भयंकर स्वरूप पाहून देवेंद्र अगदीं भयभीत झाला. त्यास त्या वेळी काय करावें हें सुचेना. अमरा- बती देऊं नये तर युद्धाचा प्रसंग येणार, व द्यावी तर आपले सर्वस्व जाणार. अशा पंचांत इंद्र सांपडल्यावर त्यानें युक्ति प्रयुक्तीनें निदान तेवढी तरी वेळ टाळावी असा विचार केला, व तो गोड स्वरानें व विनयानें वज्रनाभाला म्हणाला; " हे वज्रनाभा, तूं माझा सापत्न बंधु आहेस हें मला कबूल आहे, व त्या दृष्टीनें तूं मागतोस तेंहि योग्य आहे असे मला वाटतें, परंतु मी माझा सर्व राज्यकारभार माझे गुरु जे बृहस्पति त्यांच्या सल्यानें चालवीत असतों; तेव्हां त्यांनां या संबंधानें विचारून काय ते लवकरच आपणास कळवितों, तो पर्यंत आपण आपले वज्रपुरीस स्वस्थ असावें. " इंद्रानें वज्रनाभाची अशी विनंति केल्यावर ती त्यानें मान्य केली व तो इंद्रास लवकर जवाब देण्याविषयीं इशारत करून वज्रपुरीस निघून गेला. या प्रमाणें वज्रनाभाची समजूत केल्यावर इंद्र बृहस्पतीकडे गेला व त्यानें बृहस्पतीला हे नवीन आलेले सेकट कथन केलें. तेव्हां त्या संबंधानें बराच वेळ विचार करून बृहस्पति ह्मणाले; “ हे देवेंद्रा, तो वज्रनाभ ब्रह्मदेवाच्या वरप्रदानामुळे बहुतेकांशी चिरंजीव झालेला आहे. तेव्हां त्याच्याबरोबर युद्ध करणें हें अनर्थमूलकच आहे; एवढयासाठी हरिश्चंद्र राजाप्रमाणें बुद्धिबळानेंच या संकटाचे निवारण केले पाहिजे. " हें बृहस्पतींचे भाषण ऐकून देवेंद्रास ती कथा ऐकण्याची साहजिक इच्छा झाली. तो बृहस्पतीला ह्मणाला; गुरु महाराज, हरिश्चंद्र राजावर असे कोणतें 66