पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२रें ] अध्याय १३ वा. १५१ आला असे सर्वांना वाटलं. सहस्रार्जुनानें शोध केला, तेव्हां या सर्व गोष्टींचें कारण एका प्रचंड राक्षसाचें प्रेत हे होय असें त्याला समजलें. तो बलाढ्य राक्षस एकाच बाणानें मृत झालेला पाहून सहस्रार्जुनाला फार आश्चर्य वाटले व या राक्षसाला मारणारा वीर कोण असावा याचे त्याला मोठें गूढ पडले; त्या प्रकारामुळे सहस्रार्जुनाला फार भीति वाटली, व पूर्व रात्रीं पडलेल्या स्वप्नाची त्याला स्मृति झाली. तो एका ब्राह्मणाला बोलावून ह्मणाला, ब्राह्मण ह्मणाला; ब्राह्मणा ! रात्री मी स्वप्नांत असे पाहिले की, माझी आई रंकावती, मला नग्नावस्थेत व घडावर शिर नसतांना आपणाबरोबर घेऊन दक्षिणेच्या दिशेनें चालली आहे, तसेंच महीकावती नगर सागरांत बुडालें आहे, आणि तो जमदग्नी व ती रेणुकाही माझ्या स्वप्नांत नित्य येतात. ” राजाची ती स्वप्नवार्ता ऐकून राजा ! तूं ब्रह्महत्या केलीस ती तुला नडते आहे, या ब्रह्मह त्येच्या सोडवणुकीला कोणताही उपाय नाहीं. " ब्राह्मण असें सांगून गेला नाहीं तोंच आकाशांतून भूमीवर उल्का पडूं लागल्या, मेघांतून रक्तबिंदु पडू लागले, आणि गृध्रादिपक्षी आकाशांत घिरट्या घालू लागले. त्यानंतर धनुष्याचे टणत्कार सहस्रार्जुनाचे कानावर येऊं लागले. तेव्हां तो आपल्या शहराचे दर- बाजावर गेला व एवढा कोण वीर आला आहे तें पाहूं लागला, तो ब्राह्मणाचा एक मुलगा वारंवार धनुष्याचा टणत्कार करीत आहे असें त्याच्या दृष्टीस पडलें. तेव्हां सहस्रार्जुन त्या मुलाला ह्मणाला; “ हे मुला ! तूं कोणाचा कोण आहेस आणि निष्कारण धनुष्याचा टणत्कार कां करीत आहेत?" सहस्रार्जुनाचा हा प्रश्न ऐकून पर- शुराम झणाला, "चांडाळा ब्रह्मघातक्या ! तुझ्याबरोबर बोलणें हें देखील पाप आहे, अरे तूं ज्या जमदग्नीचा वध केलास त्या जमदग्नीचा मी पुत्र असून तुझा प्राण घेण्यासाठी आलो आहे. तुझ्या ह्या सहस्र भुजा मी तोडून टाकीन व शीर धडापासून निराळें करीन. " हें त्या लहान मुलाचें बोलणे ऐकून सहस्रार्जुन त्याला म्हणाला, मुला ! तुला अझून माझा पराक्रम माहित नाहीं, अरे मी, मोठा पराक्रमी असा रावण कालच बांधला, तेथें तुझ्यासारख्या मुलाची कथा ती काय ? " असें सहस्रार्जुन सांगत आहे तोंच “ परशुरामानें तमास्त्र सोडून सर्वत्र अंधकार केला, व अग्न्यस्त्र सोडून सर्व महिकावती जाळण्यास आरंभ केला. तेव्हां सहस्रार्जुनानें पर्जन्यास्त्र सोडून नगर विझविलें व सर्व सैन्यासह तो परशु- रामाचे अंगावर धांवून आला, पण परशुरामानें क्षणार्धीत सर्व सैन्याचा नाश केला. 66