पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ कथाकल्पतरु. अध्याय १४ वा. [ स्तबक १ सहस्रार्जुनाचा मृत्यु. नाश करून टाकला. परशुरामाचा तो पराक्रम पाहून सहस्रार्जुन अगदीं चकित होऊन गेला. हें लहान पोर काय करणार; या घमेंडीनें तो दुरूनच आपल्या सैन्याची हालचाल पहात होता, पण पाहतां पाहतां जेव्हां परशुरामानें क्षणार्धीत सर्व सैन्याचा नाश केला, तेव्हां त्याचा तो गर्व नाहींसा होऊन त्याला आपल्या सैन्याच्या नाशाबद्दल फार वाईट वाटले व तो परशुरामावर अत्यंत क्रुद्ध झाला, त्याने मोठ्या त्वेषानें पांचशे धनुष्यें आकर्ण ओढून पांचशे बाण परशुरामावर टाकले, पण परशु- रामानें ते वाण धनुष्यापासून सुटले नाहीत, तोंच पांचशें बाण सोडून ते मोडून टाकले. तेव्हां अर्जुनानें सहस्र बाण सोडले, पण त्याचाहि परशुरामानें परशुरामाची ती विलक्षण शक्ति पाहून सहस्रार्जुन थंड होऊन गेला; आपणास मदत करण्यास कोणीही वीर नाहीं असे पाहून त्यानें महादेवाची विनंति केली; त्याबरोबर एक कोटी महादेव रणावर आले व ते परशुरामावर शस्त्रप्रहार करूं लागले, परंतु परशुरामानें ते सर्व रुद्र क्षणार्धात रणावरून पळविले. मग भार्गवरामानें सहस्रार्जुनाचे अंगावर हजारों वाण सोडून त्यास अगदीं भयाकुल करून टाकलें. त्या बाणांनी सहस्रार्जुन विव्हल होऊन रणांतून पळू लागला, तरी त्याच्या मागें परशुराम एक- सारखा लागला होताच. रामानें त्या अर्जुनाला चक्राप्रमाणे सर्व भूमंडळावर फिर- विलें, त्याच्या सहस्र भुजा परशुरामानें एकवीस वेळां तोडल्या; तरी त्या फिरून उत्पन्न होत. हा चमत्कार पाहून परशुरामासहि फार आश्चर्य वाटलें. तेव्हां त्यानें गणपतीची स्तुति केली, त्या बरोबर तीन कोटी गणपती, तीन कोटी महावीर वराह रूपानें, व तीन कोटी नृसिंह, परशुरामाचे साह्यासाठी आले, परशुरामाचें तें विलक्षण सैन्य पाहून सहस्रार्जुन आपले रथासह, पलायन करण्याचे उद्देशानें वर आकाशांत उडाला; पण परशुरामानें एका बाणानेंच त्याला रथासह खाली पाडले, व परशु हातांत वेऊन त्या सहस्रार्जुनाचे मस्तक तोडलें, पण तें तत्काल पुन्हा सह- स्रार्जुनाचे धडाला चिकटले. याप्रमाणे एकवीस वेळा झालें. हा चमत्कार पाहून रामाला अत्यंत आश्चर्य वाटलें; तेव्हां परशुरामाचा बंधु विश्वावसु ह्मणाला; "रामा ! या राक्ष- साचे हृदयांत अमृत आहे, त्याचा नाश केल्यावांचून हा दैत्य मरावयाचा नाही." मग परशुरामानें आपला परशु सहस्रार्जुनाचे हृदयावर मारून त्याच्या हृदयांतले अमृत बाहेर काढले व त्याच्या छातीवर बसून त्याचा कंठनाळ कापूं लागला; त्या वेळी सहस्रार्जुन पाहू लागला, तो आपल्या हृदयावर पीतांबर नेसलेली, शंखचक्रगदापद्मधारी, कंठांत वैजयंतीच्या व तुळशीच्या माळा असलेली,