पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० [ स्तबक , 66 ती कावड खांद्यावर घेऊन परशुराम रानांत व डोंगरांत हिंडूं लागला. याप्रमाणें हिंडत हिंडत तो सह्याद्रि पर्वताचे पठारावर अमलिका नावाचे एक शहर होतें, त्या शहराजवळ आला. तेथें आल्यावर आकाशवाणी झाली कीं, “ हे भार्गवरामा ! याच ठिकाणीं जमदग्नीचें दहन कर. " अशी आकाश- वाणी झाल्यावर परशुरामानें तेथें कावड ठेविली, इतक्यांत तेथें श्रीदत्तात्रेय महाराजांची स्वारी आली. त्यांना वंदन करून परशुराम ह्मणाला; हे दिगंबर ! तुझी अनायासें गांठ पडली हें एक प्रकारें बरें झालें, मला उत्तरकार्याची मुळींच माहिती नाहीं, तेव्हां त्यासंबंधानें तूं मला माहिती दे." हें ऐकून दत्तात्रेय ह्मणाले; " वा परशुरामा ! भी या आचरणाचे संबंधानें अगदीं अज्ञानी आहे. धर्मकार्याचे मला कांहींच ज्ञान नाहीं. मला जन्म किंवा मरण हेंच जर नाहीं तर दहनक्रिया व सिंचन, पाप व पुण्य हें तरी कोठून कळणार ?" मग दत्तात्रेयानें रणुकेला वंदन करून तिची स्तुति केली. परशुरामानें तेथें चंदनाची लांकडे, कापूर, कस्तुरी, अगरु वगैरे साहित्य मिळवून त्याची चिता तयार केली, त्यावर जमदग्नीला ठेवलें व अनी लावला. त्यावेळी देवांच्या विमानांच्या गर्दीने आकाश भरून गेलें. सर्व चिता पेटल्यावर रेणुका उभी राहिली; तिनें परशुरामाला सहस्रा- र्जुनाचा नाश कर व ही पृथ्वी ब्राह्मणांना दे असे सांगून, अग्नीत प्रवेश केला. मग परशुरामानें पृथ्वींत बाण मारून सर्व तीर्थे वर आणिली. त्यांत स्नान करून यथाविधि अंत्येष्टि क्रिया वगैरे केली. कथाकल्पतरु. ४ अस्त्रचमत्कार. (6 66 त्यानंतर परशुराम तेथून निघून उत्तर दिशेकडे चालला, कांहीं मार्ग क्रमि- ल्यावर त्याला नारदमुनी भेटले. ते परशुरामाला ह्मणाले; रामा ! या नर्मदा तटार्की, भूतांनी अत्यंत प्रळय केला असून तीर्थाला अपवित्रता आणतात व ऋषींनां त्रास देतात, तर तूं आपल्या परशूनें त्यांचा संहार कर. " त्याप्रमाणे परशुरामानें नर्मदातटाकीची सर्व भूतें क्षणार्धात मारून टाकली. मग तेथून नारद व परशुराम दोघेहि मार्केडेय ऋषीकडे आले. मार्कंडेय ऋषी परशुरामाचा सत्कार करून ह्मणाले, हे भार्गवरामा ! कलिंदु नांवाचा राक्षस आकाश मार्गाने येऊन तपश्चर्येचा वारंवार भंग करतो, आणि तो ब्राह्मणांना मारून त्यांचा आहार करिते, तर त्या कलिंदु राक्षसाचा संहार कर. " याप्रमाणे मार्केडेय ऋषि पशुरामाला सांगत आहेत, तोंच आकाशांत तो कलिंदु राक्षस दिसला; मग पशुरामानें बाणानें वरचेवर तो राक्षस मारून टाकला, तेव्हां त्या राक्षसाचें प्रेत आकाशांतून एकाएकी महिकावती नगरीवर पडले. त्यामुळे त्या नगरांतील कित्येक मंदिरें, कित्येक घरें, व वृक्ष मोडले व त्याखाली नगरांतील असंख्य लोक मेले. त्या प्रेताच्या आघातानें सर्व महिकावती डळमळली, भयंकर वज्रपात व्हावा त्याप्रमाणे मोठा आवाज झाला, तो आवाज ऐकून प्रलयकाळ जवळ