पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ [ स्तबक तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले व त्यांच्याकडून असा वर मिळविला की, आह्मी अन्न व पाणी यांचें रूप धारण करून ज्याचे हृदयांत जाऊं त्याचा नाश व्हावा. असा वर मिळाल्यावर त्यांनी एका रस्त्यावर अन्नसत्र घातलें व अनेक लोकांना बोलावून त्यांना जेवायाला घालावें व अन्नरूपानें पोटांत जाऊन आपलें पूर्वरूप धारण करून त्यास मारावें, असा क्रम चालवून त्या तिघांनी हजारों लोक मारले. हा प्रकार अगस्ती ऋषींना कळल्यावर, या गोष्टीचा बंदोबस्त करावा ह्मणून ते मुद्दाम त्या तिघांकडे गेले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेवावयाला बसले. तेव्हां प्रथम आतापीनें अन्नरूपानें अग स्तीच्या उदरांत प्रवेश केला. ही गोष्ट अगस्तीचें लक्षांत आल्याबरोबर अग स्तींनीं शाप देऊन त्या आतापीस उदरांतच भस्म करून टाकलें. नंतर अद्याप अगस्ति मरत नाहीत असे पाहून वातापी कमंडलूत शिरला, त्याबरोबर अगस्तीनें तें जल प्राशन करून त्या वातापीलाही शाप देऊन भस्म केलें. तो प्रकार बघून इल्वल घाबरला व जिवाच्या आशेने पळू लागला; परंतु अगस्ति ऋषि एकसारखे त्याच्यामागे होते. शेवटीं दृष्टीआड होण्याला कोठेंच जागा नाहीं असे पाहून तो इल्वल राक्षस समुद्रांत लपला. त्या दुष्टाला समुद्रानें आश्रय दिला, त्याबद्दल अगस्तीला राग आला, व त्यांनी तीन अंजलीनी सर्व समुद्राचें पाणि पिऊन टाकिलें. तेव्हां समुद्र पुरुषरूप धारण करून अगस्तीची प्रार्थना करून ह्मणाला; " हे ऋषिराज ! या ब्रह्मघा- तक्याला मी न समजून आश्रय दिला, त्याबद्दल हा योग्य दंड पावलों, पण आतां माझ्यावर दया करा, माझ्या उदरांत जे सहस्र जीवजंतु वास करीत आहेत त्यांना भस्म करूं नका, आणि त्यांच्यासह माझी लवकरच सुटका करा." मग अगस्ती ऋषि ह्मणाले; "हे समुद्रा ! तूं त्याबद्दल मुळींच काळजी करूं नकोस " असे ह्मणून अगस्ति ऋषीनीं मंत्रबलानें इल्वल राक्षसास पोटांतले पोटांत जाळून टाकले. नंतर त्यांनी लिंगद्वारानें समुद्राचें प्राशन केलेले पाणी जीवजंतूंसह सोडून दिलें. पण अगस्तीनें समुद्राला शाप दिला कीं, “तूं ब्राह्मणघातक्याला आश्रय दिलास, ह्मणून पर्वणीवांचून तुला कोणीही स्पर्श करणार नाहीं." याप्रमाणे कथा सांगून गौतम ऋषि सहस्रार्जुनाला ह्मणाला; राजा ! ब्राह्मणाच्या शापाचा असा परिणाम होतो, हाणून ही धेनु तूं नेऊं नकोस, आणि बलात्कारानें घेऊन गेल्यास त्यांत तुझें अकल्याण झाल्या- वांचून राहणार नाही. असाच 66 कथाकल्पतरु. ३ जमदग्नीचा मृत्यु. " तुझी सर्व ब्राह्मण गौतम ऋषीचे ते भाषण ऐकून सहस्रार्जुन ह्मणाला, जमून मला नुसत्या शब्दानेंच घावरविण्याचा प्रयत्न करीत आहां, परंतु मी तुझांसारख्या ब्राह्मणांना भिणारा राजा नाहीं. ही अशी कामधेनु या तुमच्या