पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें.] अध्याय १३ वा. तेव्हां हा ब्राह्मण आपणास व आपल्याबरोबरच्या हजारों लोकांना जेवावयाला कसें घालणार, याबद्दल त्याला मोठी जिज्ञासा उत्पन्न झाली. १४७ २ आतापि, वातापि व इल्वल यांची कथा. इकडे ऋषींचीं नित्य नैमित्तिक कृत्यें आटोपल्यावर् जमदग्नीनें रेणुकेला भोजनाची तयारी करावयाला सांगितली, त्याप्रमाणें रेणुकेनें कामधेनूची प्रार्थना करून पंचपक्वान्नांनी वाढलेली सुवर्णाची ताटें मागून घेतली. नंतर एका पंक्तीला ऋषीमंडळी व एका पंक्तीला राजासह राजाची मंडळी ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे बसवून तीं खमंग पक्कान्नांची ताटें जमदग्नीनें व रेणुकेनें सर्वा- पुढे आणून ठेविलीं, नंतर सर्वजण भोजनाला बसले. तो भोजनाचा अपूर्व थाट व ती देवतादुर्लभ पक्कान्नें पाहून सहस्रार्जुन थक्क होऊन गेला. रेणुका • मधून मधून सर्वांना आग्रह करून वाढीत होती. याप्रमाणे आनंदानें जेवणे झाल्यावर सहस्रार्जुन जमदग्नीला ह्मणाला; हे ऋषिवर्या ! तुझ्या आश्रमांत हे असें अपूर्व भोजन मिळेल अशी माझी कल्पना नव्हती, या अरण्यांत हीं दुर्लभ पक्कानें व ही सुवर्णाचों ताटें पाहून मला फार आश्चर्य वाटतें; तर ही तयारी आपण कशी करतां हैं ऐकण्याची माझी इच्छा आहे. तेव्हां जमदग्नीनें सहस्रार्जुनाला कामधेनु दाखविली, व ही गाय जें जें इच्छावें तें तें देते असें सांगितलें. हे ऐकून सहस्रार्जुनाला त्या गाईचा लोभ उत्पन्न झाला व त्यानें त्या गाईची जमदग्नीजवळ मागणी केली. मग जमदग्नी ह्मणाला; सर्वांची " 66 राजा ! ही कामधेनु इंद्राने आमचे आश्रमधर्म सुव्यवस्थितपणें चालावेत ह्मणून दिली आहे. तूं मोठा राजा आहेस, तेव्हां तुला या कामधेनुची कांहींहि आवश्यकता नाहीं." यावर सहस्रार्जुन ह्मणाला; "ऋषी ! मी पाहिजे तर आपणास सहस्र गायी देतों, पण एवढी गाय मला द्या, आणि ही गाय जर आपण मला संतोषानें दिली नाहीं, तर मी तिला बलात्कारें नेईन. " तेव्हां जमदग्नी ह्मणाले; राजा ! ती गाय कोणाला देण्याचा मला मुळींच अधिकार नाहीं. इंद्राने ती मला केवळ आश्रमधर्मासाठी दिली आहे, ती तूं बलात्कारानें नेल्यास तुझा फार नाश होईल. इतकेच नव्हे तर वंशच्छेदनहि होईल. ब्राह्मणास निष्कारण दुखविणें हें कधींही कोणास श्रेयस्कर होत नाहीं. कपिल मुनीला सगर • राजाच्या मुलांनी दुखविल्यामुळे त्यानें ते साठ सहस्र पुत्र जाळून टाकले. " जमदग्नीनें इतकें सांगितलें तरी राजा हट्ट सोडीना, तेव्हां अगस्ति ऋषींनी सहस्रार्जुनाला नहुष राजाची कथा सांगून हट्ट सोडण्यास सांगितले, तरी राजा आग्रह सोडीना तेव्हां गौतमऋषि पुढे येऊन ह्मणाले; सहस्रार्जुना ! ब्राह्मणांना छळणारांचे कल्याण तर होत नाहींच पण उलट अघोगति मात्र प्राप्त होते. या अगस्ति ऋषींना मागे आतापि, वातापि आणि इल्वल या तिघांनी असाच त्रास दिला होता, या तिघांनी शंकराची बा