पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. for अध्याय १३ वा. १ कामधेनुहरण कथा. 66 त्याच अर- सहस्रार्जुन महिकावतीस राज्य करीत असतां, एकदां नारदमुनी फिरत फिरत त्याच्याकडे आले. सहस्रार्जुनानें मोठ्या सन्मानानें त्यांची पाद्यपूजा वगैरे करून कांहीं नवल विशेष असल्यास सांगण्याविषयी विनंति केली. तेव्हां नारदमुनि म्हणाले, राजा ! तुला शिकारीचें व्यसन असल्यामुळे त्यासंबंधानें एक सुवार्ता सांगण्यासाठी मी तुजकडे आली आहे. भागीरथीचे काठी दिव्यद्रुम या नांवाचे एक सुंदर निबिड अरण्य आहे, त्यांत अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत, असे शिकारीला योग्य अरण्य माझ्या पाहण्यांत आजवर आलें नाहीं. ण्यांत जमदग्नीचा आश्रम असून त्याची स्त्री रेणुका, जो कोणी येईल त्याला इच्छाभोजन देत असते. तेव्हां त्या अरण्यांत तूं शिकारीसाठी जाऊन त्या जमदग्नीऋषीचें दर्शनहि घेऊन ये. " नारदानें याप्रमाणे सहस्रार्जुनाला माहिती दिल्यावर सहस्रार्जुनानें तत्काल शिकारीची तयारी केली व बरोबर सैन्य घेऊन त्यानें नारदानें सांगितलेल्या त्या महा अरण्यांत प्रवेश केला. तें अनेक प्रकारच्या फलपुष्यांनी युक्त अरण्य पाहून सहस्रार्जुनाला फार संतोष झाला. त्या अरण्यांत सर्व प्रकारचे पशुपक्षी निर्भयपणें संचार करीत आहेत हे पाहून तर सहस्रार्जुनाला फारच आश्चर्य वाटलें. त्या अरण्यांत आणखी पुढे गेल्यावर राजाला अनेक ऋषींचे आश्रम दिसले. सर्व आश्रमांत वेदघोष चालला होता. तो ऐकून त्या राजाचा प्रधान ह्मणाला; “ राजा ! येथें ऋषींचा वास असल्यामुळे येथील पशुपक्षी निर्भय आहेत तेव्हां येथे शिकार न करितां, शिकारीसाठी आपण दुसरे अरण्यांत जाऊं. येथेंच शिकार केल्यास न जाणो कदाचित् हे ऋषि आपणावर क्रुद्ध होऊन आपणास शाप देतील.” प्रधानानें याप्रमाणे राजाला योग्य ती सल्ला दिली, पण ती त्या सहस्रार्जुनाला पसंत न पडून त्यानें आपल्या लोकांना शिकार करण्याचा हुकूम दिला व आपणहि धनुष्यबाण घेऊन निरपराधी अनेक प्राण्यांचा संहार करूं लागला. बराच वेळ शिकार खेळल्यावर राजा फार श्रांत झाला व विसावा घेत बसला. राजा सहस्रार्जुन आला आहे असे पाहून जमदग्नी आपल्या स्त्रीला ह्मणाले; रेणुके ! आज राजा या अरण्यांत आलेला आहे तर त्याला आपल्या आश्रमांत भोजनाला बोलावूं. " तेव्हां रेणुका ह्मणाली; अहो ! त्या राजाला भोजनाला बोलावल्यास तो दुष्टबुद्धि कांही तरी भलतेंच करील अशी मला भीति वाटते. :" रेणुका असें ह्मणाली, तरी तिकडे दुर्लक्ष करून जमदग्नी ऋषि सहस्रार्जुनाकडे गेले व त्याला त्याच्या सर्व लोकांसह भोजनास बोलाविलें. सहस्रार्जुनानें तें ऋषींचें निमंत्रण मोठ्या आनंदाने स्वीकारलें, व तो आपल्या लोकांसह भागीरथीवर स्नान करण्यास गेला. स्नान करून आल्यावर राजा आश्रमांत पाहतो तो भोजनाची तयारी कांहींच दिसेना, [ स्तबक 66