पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२रें.] अध्याय १२ रा. १४ " हे प्रभो दत्ता- " प्रसन्न झाल्यावर तो त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाला; त्रेया ! मला सर्व शरीरावर हात दे, व सर्व भूमंडळांत मला अजिंक्य कर. तेव्हां दत्तात्रेय त्याला म्हणाले, " तुला सहस्र हात उत्पन्न होतील, आणि ब्राह्म- गाशिवाय सूं सर्वाना अजिंक्य होशील. ” याप्रमाणे वर देऊन दत्तात्रेय तेथून अंतर्धान पावले. नंतर सहस्रार्जुनानें शंकरांची कित्येक वर्षे तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले व त्यांच्याकडून त्यानें अमृत मिळविलें. याप्रमाणें दत्तात्रेय व महादेव यांना प्रसन्न करून घेतल्यावर सहस्रा अर्जुन महिकावतीस आला, व तेथें राज्य करूं लागला. त्यानें त्या वरप्रदानामुळे संपूर्ण पृथ्वी जिंकून सर्वांना त्रस्त करून सोडलें. बसला. J एकदां लंकेचा राजा रावण दिग्विजयासाठी गेला होता, तो तिकडून जय मिळवून लंकेस परत जात असतां, पूजेची वेळ झाली ह्मणून त्यानें आपल्या सैन्यासह नर्मदेच्या कांठी मुक्काम केला व तो स्नान वगैरे करून शिवपूजा करीत त्याच वेळी सहस्रार्जुन स्नानासाठीं नर्मदेवर आला व पाण्यांत उतरून जलक्रीडा करूं लागला. त्यानें सहज लीलेनें आपल्या सहस्रभुजा पाण्या- वर पसरून पाण्याला बंधारा घातला, त्यामुळे नर्मदेचें पाणी वरच्या बाजूला वाहूं लागले. रावण त्याच बाजूला नर्मदेच्या कांठाशीं बसून शिवपूजा करीत होता. इतक्यांत नर्मदेचें पाणी वाहून त्यायोगे रावणाने स्थापन केलेले शिवलिंग, पूजा वगैरे सर्व वाहून गेलें, तेव्हां रावणास अत्यंत राग आला व त्यानें आपल्या प्रधानाला असे होण्याचे कारण काय याचा शोध करण्यास सांगितलें. त्याचा प्रधान पुढे जाऊन पाहू लागला तो सहस्रार्जुन नर्मदेंत स्नान करीत असून त्याने आपल्या बाहूंनी पाण्याला बंधारा घातला आहे. तो पाहिलेला सर्व प्रकार प्रधानानें रावणास येऊन सांगितल्यावर रावणास अत्यंत क्रोध आला व तो सर्व सैन्यासह त्या सहस्रार्जुनाचे अंगावर धांवून गेला, पण त्या सहस्रार्जुनानें क्षणाधीत रावणाच्या सैन्याचा नाश करून रावणास धरलें व त्याला आपल्या बंदीशाळेत ठेवलें. मग तें वर्तमान रावणाच्या प्रधानानें लंकेस जाऊन रावणाचा बाप विश्रवा व आजा पौलस्ती यांना सांगितलें. ते दोघे ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांनी ब्रह्म- देवाला झालेली सर्व हकीकत सांगून, रावणाची सुटका करण्याविषयी विनंति केली. मग ब्रह्मदेव त्या दोघांना घेऊन महिकावतीस सहस्रार्जुनाकडे आला व त्यानें रावणास सोडून देण्याविषयीं सहस्रार्जुनाला सांगितलें. सहस्रार्जुन ह्मणाला; हे चतुरानना ! तूं माझ्या घरीं याचक होऊन आलास, हीच त्या रावणाला पुष्कळ शिक्षा झाली.” असें ह्मणून सहस्रार्जुनाने रावणास ब्रह्मदेवाचे स्वाधीन केलें. असा तो शक्तिशाली सहस्रार्जुन महिकावतीस राज्य करीत होता. "