पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. [ स्वयक ू हे वसूचें बोलणें ऐकून जमदग्नीनें, पितृआज्ञा उल्लंघिली म्हणन त्याला शाप देऊन गतप्राण केला. नंतर त्यांनी विश्वावसूला बोळावून रेणुकेला मारण्यास सांगितलें, पण त्यानेंहि वसू प्रमाणें रेणुकेला मारण्याचें नाकारिल्यावर जमदग्नीनें त्यालाहि शाप देऊन गतप्राण केला. याप्रमाणं जमदग्नीच्या चारही मुलांनी आपल्या आईला मारण्याचे नाकारल्यामुळे जमदमीनें चवघांनांहि 'शाप देऊन निश्चेष्ट केले. मग जमदग्नीनें परशुरामास बोलावून त्याला रेणुकेचा वध करण्यास सांगितलें, त्याबरोबर परशुरामानें हातांतला परशु रेणुकेच्या मस्तकावर मारून तिचा नाश केला. आपले आज्ञेप्रमाणे परशुराम वागला दें पाहून जमदग्नीला फार संतोष झाला व तो त्याला कांहीं मागावयाचे असल्यास माग, हाणून ह्मणाला; तेव्हां परशुराम आपल्या बापाला हाणाला; कांहीं देणं असेल तर आईला व चवधां बंधूंना सजीव करा व मी वध केल्याचं त्यांना विस्मरण करा, एवढेच मागणें आहे." मग जमदग्नीनें कमंडलूंतले उदक पांचजणांवर सिंचन करून त्यांना जिवंत केले. आदिमाया जगन्मोहिनी याप्रमाणं जिवंत झाल्यावर सर्वांना अत्यंत आनंद झाला व देवांनीं दुंदुभी वाजवून तिजवर पुष्पवृष्टि केली. त्या वेळी रागाच्या सपाट्यांत आपण भलतेंच अविचाराचं कृत्य केले होतें, असें जमदग्नीला वाटून त्यानें तेव्हांपासून राग सोडून दिला." ३ सहस्रार्जुनाचा पराक्रम. बाबा जर १४४ A हे जनमेजय राजा ! या परशुरामाप्रमाणेंच तुला सहस्रार्जुनाचा कसा जन्म झाला ते सांगतों, ह्मणजे पुढील कथा तुला चांगली समजेल. " सहस्रार्जुनाच्या बापाचें नांव कृतवीर्य असे असून त्याच्या आईचे नांव रंकावती असें होतें. तो सोमवंशी सहस्रार्जुन महिकावती नांवाच्या नगरांत राज्य करीत होता. तो असुर झाला होता, याचं कारण असे की, एकदां सायंकाळीं रंकावती कृतवीर्या जवळ भोग मागूं लागली, तेव्हां कृतवीर्यानं ती वेळ चांगली नसून या वेळी संभोग केल्यास असुर प्रकृतीचा पुत्र होतो हाणून रंकावतीला सांगितले. परंतु रंकावती ऐकेना हाणून त्याने तिला रतिदान दिले. ती संधी साधून शिस्त्री राक्षसाचा पुत्र मधु नांवाच्या शाप पावलेल्या राक्षसानें तिच्या गर्भात प्रवेश केला. त्याने एकदां शंकरास पूजेच्या वेळीं त्रास दिला होता, तसेंच पार्वती अनेक प्रकारची फुले आणून महादेवाची प्रत्यहीं पूजा करीत असे. त्या पार्वतीच्या त्याने एक हजार पूजा मोडल्या होत्या; हाणून महादेवानें त्याला शाप दिला होता की, तूं पुढील जन्मीं हातांवाचून जन्म पावशील व पुढे फार दुःख भोगशील, त्याप्रमाणें तो मधु दैत्य नारायणाचे हातानें मृत झाल्यावर रंकावतीचे गर्भात प्रवेश करून त्यानें सहस्रार्जुन या नावानें पृथ्वीवर जन्म वेतला. तो जन्मला तेव्हां त्याला शंकराच्या शापामुळे हात मुळींच नव्हते. मग त्याने दत्तात्रेयाची पुष्कळ दिवस सेवा करून त्यांनां प्रसन्न करून घेतले. दत्तात्रय