पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] अध्याय १२ वा. १४३ आहे. तूं साक्षात् जगजीवन प्रभु असून अशा रीतीनें मला पित्याचा अधिकार दिलास याबद्दल मला मोठा संतोष वाटतो. " महादेवाचें या प्रमाणे परशुरामाशी बोलणें होत आहे इतक्यांत तेथें नारदमुनी आले; वैकुंदपतचं व कैलासपतीचं एकाच वेळी त्यांस दर्शन झालें. मग नारदाला दोघांनी आशीर्वाद देऊन, भूतलावर कांहीं चमत्कार पाहण्यांत आला असल्यास तो आह्मांस श्रुत करावा ह्मणून त्रिनंति केली. तेव्हां नारद ह्मणाला, " सांप्रत पृथ्वीवर जर कांही अपूर्व असेल तर तो एक जमदमीचा आश्रम होय. तेथे कल्पतरु व कामधेनु असल्यामळे रोगुका माता हजारों ऋषींनां प्रत्यही इच्छाभोजन देत आहे. याहून अपूर्व असे माझ्या कांहींहि अवलोकनांत आले नाहीं." २ परशुरामकृत मातृवध. 66 परशुराम गणपतीजवळून परशु व परशुविद्या घेऊन आल्यावर काही दिव- सांनी रेणुका भागीरथीवर स्नानाला गेली असतां, तेथें कुबेर विमानांत बसून आपल्या स्त्रियांसहवर्तमान स्नानासाठी आला. त्या भागीरथीच्या पवित्र जलांत कुबेर व त्याच्या स्त्रिया जलक्रीडा करूं लागल्यावर रेणुकेलाहि त्याप्रम में जलक्रीडा करण्याची इच्छा उत्पन्न झाली. ती आपले मनांत म्हणाली, माझा पति जर या वेळा मजबरोबर असता, तर मीहि अशीच जलक्रीडा केली असती. याप्रमाणे मनांत खट्टू होऊन रेणुका बराच वेळ तेथें कुबेर व त्याच्या स्त्रिया यांची क्रीडा पहात उभी राहिली. इतक्यांत तिला आश्रमांत सडासंमार्जन करण्याची आठवण झाली व तो घाईघाईनें आश्रमांत आली. इकड जमदान, रेणुकेनें आश्रमांत अद्यापि सडासंमार्जन केले नाही म्हणून तिजवर अत्यंत रागावले होते. रेणुका आश्रमांत आल्याबरोबर जमदग्नि तिजवर ऋद्ध होऊन म्हणाले, “ माझी होमाची वेळ होऊन गेली तरी तूं इकडे सडासंमार्जन वगैरे कांहीं एक न करितां तिकडे कुबेराची जलक्रीडा पहात उभी राहिलीम, व त्याविषयी पापवासना हि मनांत आणिलीस, यावरून तूं व्यभिचारिणी आहेस. तर माझ्या आश्रमांतून आतांच्या आतां चालती हो, मला आपले तोंड देखील दाखवूं नकोस. " हा जमदशीचा राग पाहून रेणुका अत्यंत भयाकुल झाली, ती आपल्या पतीला म्हणाली, " माझ्या पोटी प्रत्यक्ष नारायण अवतरले आहेत. आणि तो प्रभु यावजीवमात्रांचा पिता आहे, तेव्हां मलाहि हे सर्व प्राणीमात्र पौत्राप्रमाणे आहेत. आपणावांचून मी सर्व पुरुषांकडे पौत्रदृष्टीने पाहते. मी आपणास माझें दैवत समजतें. आपले पादोदक, तेंच मी सर्व तप असे मानतं. असे असून आपण मला व्यर्थ दोष देत अहां. हे ऐकून जमदग्नी अधिक क्रुद्ध झाले व थोरला मुलगा जो वमु त्याला बोलावून रेणुकेला ठार सांगितले. तेव्हा बसु म्हणाला, मारण्यास बाबा ! ही रेणुका म्हणजे संपूर्ण विश्वाची माता आहे, हिचा वध केला असतां मी खात्रीनें अधःपावाला जाईन. *