पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ [ [स्तक केला. ऊन, वारा, पाऊस, वगैरे कष्ट सहन करून व पंचार्माचें साधन करून भगवान परशुराम, महादेवाला प्रसन्न करून घेण्याचें तप करीत होते. कांहीं दिवस तप केल्यावर महादेव प्रसन्न झाले व इच्छित वर माग म्हणून म्हणाले. तेव्हां परशुराम म्हणाले, " हे कैलासपते नीलकंठा ! मला आपण धनुर्विद्या शिकवावी, " महादेव म्हणाले, " मी तुला धनुर्विद्या शिकवितों, पण तूं कोणाचा कोण वगैरे सांग, म्हणजे ती धनुर्विद्या तुला देईन. " परशुराम म्हणाले, "हे महादेवा ! माझे नांव परशुराम आहे. मी जमदग्नीचा पुत्र असून, रेणुका ही (माझी माता होय. : हें परशुरामाचें वोलणे ऐकून महादेव हांसले व म्हणाले, हे वैकुंठपते नारायणा ! माझ्यापुढे हा लपंडाव कां करतोस ! तुझी 'कर्तुमकर्तुम- न्यथाकर्तुम् शक्ति असून तुला माझ्या धनुर्विद्येची काय आवश्यकता आहे; मी आपली धनुर्विद्या तुला संतोपानें देऊन दुष्ठांच्या संहारासाठी आपले पाशुपतास्त्र देतों. " असें म्हणून शंकरांनी परशुरामाला धनुर्विद्या व पाशुपतास्त्र दिले व ते अदृश्य झाले परशुराम तपश्चर्येला गेल्यावर इकडे रेणुकेला अगदीं करमेना म्हणून जमदग्नीने तिला खेळण्यासाठी एक मुलगी दिली, तिचे नांव त्रिकुला असें ठेषिलें. तिच्यासहवर्तमान रेणुका आनंदानें रहात असे. नंतर लवकरच परशुराम परत येऊन त्यानें आईबापास वंदन करून पाशुपतास्त्र व धनुर्विद्या मिळविल्याचं सांगितलें. कथाकल्पतरु. नंतर परशुरामानें पुन्हां मातापितरांची आज्ञा घेऊन कैलास पर्वतावर गमन केलें व गणपतीच्या तपश्चर्येला आरंभ केला. कांही वर्षे गणपतीची आरा- वना केल्यावर गणपति प्रसन्न झाले व त्यानी परशुरामाला तुझी काय इच्छा आहे म्हणून प्रश्न केला. तेव्हां परशुराम म्हणालाः " हे अयोनिसंभव लंबोदरा ! मला तूं आपली परशुविद्या दे." त्याप्रमाणे गणपतीने त्यावेळी परशुरामाला परशु व परशुविद्या दिली. तेव्हां तेथें महादेवही होते. ते परशुरामाला म्हणाले; " भार्गवरामा ! तुला तुझ्या आईबापाविषयी माहिती आहेच, पण मीहि कांही सांगतो. एक स्त्री एका अरण्यांत माझ्या प्राप्तीसाठी सभोंवतीं प्रखर प्रळयाग्नि पेटलेला असून मध्ये उभी राहून तपश्चर्या करीत होती, तो चमत्कार पाहून मला फार आश्चर्य वाटले. मग मी तो अग्नि आपल्या मुखानें भक्षण करून, त्या स्त्रीला प्रसन्न झालों. तेव्हां ती म्हणाली, "तूं हा अभि खाऊन टाकलास म्हणून तुला जमदग्री असे म्हणतील. तसेच हे महादेवा ! मी आदिमाया असून तुझ्या प्राप्तीसाठी आजवर तपश्चर्या केली आहे, तर तूं माझा स्वीकार कर. " याप्रमाणे त्या स्त्रीने माझी विनंती केल्यावर मी तिला म्हणालों, “हे आदिमाये ! मी तुझी इच्छा पुरी करीन. ऋचिक ऋषीचे उदरों जमदनी म्हणून जन्म घेईन, आणि हिमालयपर्वत रेणु राजा होईल, त्याचे उदरीं तूं रेणुका ह्मणून जन्म घे आणि नंतर माझा स्वीकार कर. हे परशुरामा ! या प्रमाणे तुझ्या आईबापाची कथा