पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२. ] अध्याय १२ वा. आला व तिला हाणाला, " हे आदिमाये अंबिके ! मला चक्रपाणीनों तुझ्याकडे पाठविले आहे, ते तुझ्या उदरी आल्यास तूं त्यांचें तेज सहन करशील किंवा नाही असे त्यांनी विचारले आहे. " हैं ऐकून रेणुका हांतून नारदाला हाणाली, नारदा ! भगवान् माझ्या हृदयांत केव्हां समावतील असें मला झाले आहे, तर त्यांनां गर्भवासांत लवकर येण्यास सांग. मी प्रभूचें तेज सहज सहह्न करीन.” रेणुकेचें हें बोलणं ऐकून नारद तेथून भगवंतांकडे निघून गेला. .66 अध्याय १२ वा. १ परशुराम अवताराची कथा. रेणुक्रेनें नारदावरोवर-गर्भवासांत वे असा भगवंतास निरोप पाटावल्यावर, भगवान् विष्णुनी रेणुकेच्या उदरीं प्रवेश करून केवळ भक्तांसाठी ते गर्भवासाचें दुःख भोगूं लागले. श्रीपतीला माझे तेज रेणुका कस सहन करील अशी काळजी होती, पण भगवान् त्या आदिमायेच्या उदरांत पाहू लागले तो त्यांना त्याचा अंत मुळींच लागेना. माझ्यासाखे शेंकडों, हजारों नारायण या उदरांत समावतील अशी त्यांची खात्री झाली. रेणुकेला पूर्ण दिवस झाल्यावर वैशाल शुद्ध तृतीयेचे दिवशीं पुनरवसु नक्षत्रावर ती प्रसूत होऊन पुत्र झाला. त्या आनंददायक वार्तमुळे संपूर्ण त्रिभुवनांत आनंदोत्सव सुरू झाले. दुंदुभीच्या नादानें दशदिशा भरून गेल्या, जिकडे तिकडे निशाणे, पताका, ध्वजा उडूं लागल्या आणि गुलाल उधळल्यामुळे दिशा धुंद होऊन गेल्या; स्वर्गातून देव सारखी पुष्पवृष्टी करीत होते. याप्रमाणे त्या मंगलकारक प्रसंगी सर्वांनां आनंद झाला, पण सहस्रार्जुनाला फार भीति वाटूं लागलो. त्याचें हृदय धडधड उडूं लागलें, हातपाय थरथर कांपूं लागले आणि त्याला स्पष्ट बोलवेना. तो आपल्या आईला हाणाला, “ हे रकावती ! माझ्या हृदयांत अशी एकाएकी भीति कां भरली ते कळत नाही. " त्या सहस्रार्जुनाचे आईने ब्राह्मणांना बोलावून शहांची शांती वगैरे केली. इकडे जमदमीनें त्या आनंददायक प्रसंगी अनेक ब्राह्मण बोलावून त्यान संतोपित केलं. मुलाचें नाव परशुराम असे ठेवले. परशुरामाचें वय व्रतवाल योग्य झाल्यावर जमदग्नीने सर्व ऋषि, राजे, वगैरे बोलावून मुलाचें मौजिबंधन मोठ्या थोटानें केलं. परशुराम म्हणजे प्रत्यक्ष भगवान, त्यांच्या जिव्हाग्रावर सरस्वती खेळत होती. तेव्हां त्यांनां वेदाचें वगैरे अध्ययन करण्यास दिवस ते किती लागणार ? संपूर्ण शास्त्रांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर परशुरामानें जमदनीची परवानगी घेऊन कैलास पर्वतावर गमन केले व तेथे महादेवाचे तप करण्यास आरंभ