पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[] [स्तक , हे जनमेजय राजा, पूर्वी कश्यप या नांवाचे एक महातपोनिधि ऋषि होऊन गेले. त्या कश्यपास अनेक स्त्रिया होत्या. त्या सर्व स्त्रियांनां कश्यपापासून शतशः पुत्र झाले होते. कश्यप ऋपीला दिति या नांवांची स्त्री होतीं, त्या स्त्रीला वज्रनाभ व सुनाभ अशी दोन अपत्यें झाली होती. वज्रनाभ हा वडील असन सुनाभ हा धाकटा होता. ते दोघेहि मोठे कार्यकुशल व शक्तिशाली अस- ल्यामुळे त्यांनी अनेक प्रदेश जिंकून विस्तीर्ण राज्य संपादन केलें होतें. सुवर्णा- च्या मेरुपर्वतावर त्यांनी एक विशाल नगरी बांधून ती आपल्या राज्याची राजधानी केली व तिचें नांव वज्रपुरी असें ठेविलें. हें वज्रपुरी शहर अत्यंत सुंदर असून फारच मोठे आहे. त्या शहराचा विस्तार द्वादश योजनें विस्तीर्ण आहे असे सांगतात. या शहरांत अनेक प्रकांडप्रासाद असून शहरा सभोवती मनोहर अशी अनेक उपवनें आहेत. त्या शहरांत वज्रनाभ हा राज्य करीत असतांनां त्यास, सर्व सृष्टि जिंकून तिचे आपण मालक व्हावें, असें वाटूं त्या कार्यासाठी कोणातरी देवाचें वरप्रदान मिळवावे असे वाटून त्यानें ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी प्रयत्न सुरू केला. तो वज्रनाभ हटयोगांत चांगला प्रवीण असल्यामुळे त्यानें आपल्या योगबलानें ब्रह्मदेवाला लवकरच प्रसन्न केलें. त्याच्या एकनिष्ठ भक्तीमुळे ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले व त्यांनों वज्रनाभाला तुझी काय इच्छा आहे, ह्मणून विचारिलें; तेव्हां वज्रनाभ ब्रह्मदेवाला विनत मस्त कानें ह्मणाला; हे सत्यलोकाधिपति ब्रह्मदेवा, तूं या दासाला प्रसन्न झालास हे अनंत उपकार होत. माझें मागणे अगदीं अत्यल्प आहे. माझी आशा पूर्ण करणे दें तुला सहज साध्य आहे. हे ब्रह्मदेवा ! माझ्या राज्याचा विस्तार सर्वत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. देव आणि देवेंद्र, पृथ्वीवरील सर्व भूपाळ, अष्ट दिशांचे दिक्पाळ व सूर्य, चंद्र या सर्वोचा माझ्या हातानें पराभव व्हावा व ते माझ्या बंदिखान्यांत पडावेत असे सामर्थ्य तूं मला दे. तसेंच हे सत्यलोक- नाथा ! मला तूं चिरंजीव कर. मृत्यु होऊं देऊं नकोस. होऊं देऊं नकोस. लागले. 66 कोणत्याही शस्त्रानें माझा देव, राक्षस व मनुष्य यांच्या हातानें माझा मृत्यु तसेंच पशु, पक्षी, सर्प व कीटक यांच्याकडूनहि माझा मृत्यु घडवून आणूं नकोस. सारांश, शरीर धारण करणारे जेवढे प्राणि या विश्वांत आहेत त्या कोणांकडूनहि मला मृत्यु येऊं देऊं नकोस. " याप्रमाणें वज्रनाभानें मागणें मागितल्यावर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न अंतःकरणानें 'तथास्तु' म्हणून म्हणाले, व ते तेथून सत्यलोकीं निघून गेले. कथाकल्पतरू. २ वज्रनाभाचें अमरावतीस आगमन. वज्रनाभ राजाला ब्रह्मदेवाकडून वरील वर मिळाल्यावर तो अत्यंत उन्मत्त झाला व तो संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करण्याचे तयारीला लागला. त्यानें आपलें: सैन्य सर्व बाजूंनी उत्तम सिद्ध केले व त्यांच्याकडून तो अनेक देश जिंकूं लागला;