पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० कथाकल्पतरु. ३ रेणुकेचें स्वयंवर

, पुढे काही वर्षे गेल्यानंतर ऋचिक ऋषीच्या आश्रमांत अनेक ऋषी आले व त्या सर्वोनी काशीयात्रेला जाण्याचा विचार केला, त्याप्रमाणे सुमुहूर्त पाहून सर्व ऋषि बरोबर जमदग्नीला घेऊन काशीयात्रेला निघाले, कांहीं दिवस मार्ग क्रमिल्यावर ऋषीनां कान्यकुब्ज नगराच्या राजानें आपल्या मुलीचे स्वयंवर मांडले आहे असे कळल्यावरून ते षि तो समारंभ पाहण्यासाठी स्वयंवराचें मंडपात आले. स्वयंवराचे दिवशीं अनेक देशचे राजे, राजपुत्र वगैरे रेणुकेच्या प्राप्तीसाठी आले होते. तो अपूर्व समारंभ पहावा हाणून सर्व ऋषि मंडपांत येऊन बसले. राजानेंहि त्यांचा योग्य सत्कार करून ऋषि समारंभास आल्याव द्दल मोठा संतोष दर्शविला, व त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांनां आसने बसण्या- साठी दिली. राजेहि बहुमूल्य अशा रत्नखचित आसनावरून रांगेनें बसले. स्वयंवराची वेळ झाल्यावर त्या रेणु राजाची मुलगी रेणुका, जरीचें झगझगीत वस्त्र नेसून व अंगावर अनेक उंची अलंकार घालून हातांत रत्नकुसुमांची माळ वेऊन स्वयंवर मंडपांत आली. स्वयंवरासाठी आलेले राजेमहाराजे या सर्वांचें ती निरीक्षण करून केवळ स्वयंवर समारंभ पाहण्यासाठी आलेल्या ऋषि मंडळा समोर गेली व तिनें ऋचिक ऋषीचा मुलगा जमदग्नि याचे गळ्यांत माळ घातली. रेणुका व जमदग्नि यांची गांठ या प्रमाणे पडल्यावर स्वर्गात देवांनी दुंदुभी वाजवून व पुष्पवृष्टि करून आनंद प्रदर्शित केला. रेणुकेनें आपणापैकी कोणास न विचरितां एका ब्राह्मणाला वरले हे पाहून स्वयंवरासाठी आलेल्या राजांनां फार वाईट वाटले. त्या सर्वांनी असा विचार केला कीं, रेणु राजा- बरोबर युद्ध करून रेणुकेला पळवून न्यावी. त्याप्रमाणे सर्व राजे आपआपले सैन्य घेऊन येऊन रेणु राजाबरोबर युद्ध करूं लागले. ते राजे असंख्य असून त्यांचें सैन्यहि फार मोठें होतें, यामुळे रेणु राजाला जय येण्याची चिन्हें दिसेनात, तेव्हां जमदग्नी रेणु राजाचे साह्याला गेला व त्याने हातांत धनुष्यबाण धारण करून विलक्षण युद्ध कौशल्याने सर्व राजांनां पळवून लावलें. मग रेणु राजानें जमदनीला व सर्व ऋषींनां चार दिवस आपल्या घरीं ठेवून घेतलें, व मोठ्या थाटानें लग्न सोहळा केला. त्यानें जमदग्नीला घोडे, रथ, गायी, दास, दासी, पुरें, शहरें, देश व रत्नभांडार देऊन कन्यादान केले व भागीरथीचे काठी वास करावा ह्मणून त्यासी विनंति केली. त्या उत्सव समयीं इंद्राने जमदशीला कामधेनु व कल्पतरू दिला. जमदग्नी रेणुराजाचे विनंतिप्रमाणे आपले स्त्रीसह भागीरथीचे कांठी राहिला व त्याचा बाप ऋचिक काशीयात्रा करून गोदावरी तटाकीं येऊन राहिला. कांहीं दिवस रेणुकेचे पति- सहवासांत गेल्यावर तिला अग्नि, वायु, सूर्य व इंद्र हे अनुक्रमानें वसु, विश्वावसु, वृद्ध भानु व बृहत्कर्ण असे चार पुत्र झाले. नंतर कांही दिवसांनीं रेणुकेकडे नारद हत्ती, [ स्तवक