पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] अध्याय ११ वा. च्यवन १ पळवून नेऊं लागला. त्यावेळीं पुलोमा गरोदर असल्यामुळे त्या दुष्टाच्या दांड- गाईने तिचा गर्भ गळून पडला. तेव्हां पुलोमेला त्या राक्षसाचा अत्यंत राग आला, व तिनें त्याला शाप देऊन भस्म केले. पुढे भृगुऋषि स्नान करून आल्यावर त्यांच्या नजरेस तो प्रकार पडला. तेव्हां त्यांनी कमंडलूंतलें उदक गर्भावर सिंचन केले व गर्भ सजीव केला. त्या मुलाचें नांव ' असें टेवलें. पुढे त्या च्यवन ऋपीला ऋचिक या नांवाचा पुत्र झाला. तो महातापसी अत्यंत पुण्यशील ऋचिक ऋषि गोदावरीचे कांठी आश्रम बांधून राहिला होता. त्याची तपश्चर्या फार कडक असून त्यानें एकदां कांहीं कारणावरून गोदावरीला शाप देऊन जटायूच्या प्रस्थान क्षेत्राजवळ तिचे दोन भाग केले. सोमवंशी गाधि राजानें आपली मुलगी सत्यवती या ऋचिक ऋषीला दिली होती. त्या गाधीराजानें असा पण केला होता की, जो सहस्र शामकर्ण आणून देईल त्याला मी आपली मुलगी देईन, त्या प्रमाणें ऋचिक ऋपीनें त्या गाधी- राजाला सहस्र घोडे देऊन सत्यवती मिळविली होती. एकदां एका सिंहस्थ पर्वणींचं वेळी गाधी राजा आपली स्त्री जी पौलकुशी, तिच्यासह गोदावरीचे कांठीं आला, त्या वेळी पौलकुशी सत्यवतीला हाणाली, सत्यवती ! तूं आपल्या पतीला माझ्यासाठी विनंति करून पुत्र होईल असा वर माग. " तेव्हां सत्यवती आपल्या पतीला ह्मणाली, की "माझ्या आईला पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे. तसेंच मलाहि पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे." मग ऋचिक ऋषीनें भाताचे दोन पिंड तयार करून ते मंत्रून सत्यवती जवळ दिले, व तिला सांगि तलें कीं, यांतील क्षत्रीय पिंड तुझे आईला दे, व तापस पिंड तूं भक्षण कर. त्या प्रमाणे सत्यवतीनें पात्रावर पिंड ठेविले व आईला खाण्यासाठी बोलविलें. पौलकुशीनें ते दोन पिंड पाहून तिला साहजिक असा संशय आला की, सत्य- वतीचा पिंड चांगल्या पुत्र प्राप्तीचा असावा व आपला साधारण पुत्र प्राप्तीचा असावा. ह्मणून तिनं आपल्या मुलीला पाणी आणण्यासाठी पाठविलें व ती गेल्यावर इकडे पिंडांची अदलाबदल करून ठेविली. पुढे ते पिंड दोघींनी खाल्यावर दोघीहि गरोदर झाल्या, परंतु दोघींनां डोहाळे निरनिराळे होऊ लागले. सत्यवतीला युद्धविषयक व पौलकुशीला स्नानसंध्येच डोहाळे होऊं लागले. तो प्रकार पाहून सत्यवतीनें दुसराच पिंड भक्षण केला, असं ऋचिक ऋषीच्या लक्षांत आले. तेव्हां सत्यवती आपल्या पतीला ह्मणाली, “माझी इच्छा मला सात्विक वृत्तीचा पुत्र व्हावा अशी आहे. मग ऋषीनें तशी व्यवस्था केली, पण तुझे पुत्राचे पोटीं जो पुत्र होईल तो महा तेजस्वी होईल असें तिला सांगितले. पुढे सत्यवतीचे पोटी त्रिपुरारी व कश्यप एक रूप होऊन आले ऋत्रिक ऋषीनें त्या मुलाचें नांव जमदग्नि असें ठेविलें.