पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकस्पतरु. [ स्तनक प्रळय मांडला आहे, त्यामुळे सर्व प्राणी त्रस्त झाले आहेत. या वेळीं तूं दुष्टांचा संहार न केल्यास सर्व पृथ्वीवर हाहाःकार होईल. हे प्रभो ! हिरण्याक्षाचे वेळी वराह अवतार, हिरण्यकश्यपूचे वेळीं नृसिंह अवतार, व बळीचे वेळी वामन अवतार घेऊन त्यांचे हनन केलेस, त्याचप्रमाणे प्रभो यावेळी अवतार धारण करून पृथ्वीवर उन्मत्त झालेल्या राक्षसांचा तूं संहार कर." देवांची ती करुणा- वाणी ऐकून भगवान् श्रीविष्णु प्रसन्न झाले व म्हणाले; " मी लवकरच अवतार धारण करून दुष्टांचा संहार करीन, परंतु या वेळीं मी अदितीचे उदरीं संपूर्ण अंशानें येणार आहें, तेव्हां मी तिचे गर्भी असतां ती माझें तेज सहन करील अशी कांहीं व्यवस्था करा. " लक्ष्मीरमण श्रीपतींनीं, याप्रमाणे देवांना आश्वासन दिल्यावर देव आनंदित होऊन निवाले ते अदितीकडे आले. तिला त्यांनी झालेले सर्व वर्तमान सांगून प्रभु गर्भात आल्यावर त्यांचें तेज सहन व्हावे म्हणून तिला आपआपली तेजशक्ति दिली; परंतु देवांच्या या तेजशक्तीनें कांहीं कार्यभाग होणार नाही, असें अदितीला वाटल्यावरून तिनें कैलास पर्वतावर जगन्माता जी पार्वती तिची तपश्चर्या केली; तेव्हां कित्येक वर्षांच्या तपामुळे तिला पार्वती प्रसन्न झाली. त्यावेळी अदिती पार्वतीला म्हणाली; "ह आदिमाये जगज्जननी ! भगवान् महाविष्णु माझे उदरीं सर्व अंशाने अवतार धारण करणार आहेत, भगवंतांचें तेज मला सहन होणार नाही; तर हे माते पार्वती ! तूं माझ्या शरीरांत वास कर. म्हणजे मी भगवंताचा गर्भ सहन करीन. " अदितीची विनंति मान्य करून पार्वती अदितीला म्हणाली; " मी तुझे ठिकाणी वास करीन, परंतु तूं आपले पतीचे शरीरांत महादेव वास करतील अशी तजवीज कर. " पार्वतीनें अर्से सांगितल्यावर अदिती शंकराचे तपश्चर्येला वसली व तिने शंकरास आपल्या भक्तिबळानें प्रसन्न करून घेतलें. महादेव प्रसन्न झाल्यावर अदिती म्हणाली, हे कैलासपते ! भगवान् श्रीपती माझे उदरीं अवतार घेणार आहेत, तर तुम्ही व कश्यप एक होऊन माझा स्वीकार करावा. " अदितीची ही विनंति ऐकून महादेव तथास्तु म्हणाले. याप्रमाणे महादेवांचा वर मिळाल्यावर अदिती आणि पार्वती एकरूप झाल्या व कश्यप आणि शंकर एकरूप झाले. त्यांनी कन्यारूप धारण करून रेणुराजाचे घरीं यज्ञकुंडांतून प्रवेश केला. तीच ही रेणुका होय." 66 २ जमदग्नि ऋषीची कथा. राजा जनमेजया ! कश्यप व त्रिपुरारि या दोघांनी एकरूप होऊन पृथ्वीवर कसा अवतार घेतला तें तुला सांगतो. " पूर्वी भृगुऋषि या नावाचा एक महान पवित्र तापसी होता. त्याची पुलोमा नावाची एक स्त्री होती, एकदां भृगुऋषि स्त्रीयेला आश्रमांत ठेऊन सानासाठीं गेला असतां मागें तालजंघासुर भृगुऋ रूप धारण करून आश्रमांत आला व पुलोमेला बलात्काराने उचलून