पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय ११ वा. 66 अध्याय ११ वा. K रेणुका व जमदग्रीची कथा. १ रेणुकेचा जन्म. जनमेजय राजानें वैशंपायन ऋषीला परशुरामाची कथा सांगण्याची विनंति केल्यावरून वैशंपायन ऋषि, जनमेजय राजाला परशुरामाची कथा सांगू लागले. ते ह्मणाले; राजा ! पूर्वी इक्ष्वाकु वंशांत रेणु या नांवाचा एक महान् पराक्रमी राजा होऊन गेला. भागीरथीचे कांठीं कान्यकुब्ज नांवाच्या प्रसिद्ध शहरी राहून तो आपल्या राज्याचा बंदोबस्त करीत असे. त्या राजाला कांहीं संतति नस- ल्यामुळे त्यानें पुत्रप्राप्तीसाठीं शंकराची भक्तिभावानें कांही वर्षे सेवा केली, तेव्हां महादेव त्याला प्रसन्न होऊन ह्मणाले; " हे रेणु राजा ! तुला एक उत्तम, मुशील, सर्वगुणसंपन्न अशी मुलगी होईल. आदिमायेप्रमाणे ती शक्तिशाली होईल व तिची कीर्ति दिगंतरी होईल. तिच्या दर्शनानें व नामस्मरणानें विघ्नांचा नाश होईल. त्या तुझ्या मुलीची पुराणे देखील स्तुति करतील. तसेच तुला त्या कन्येनंतर एक पुत्रहि होईल. " याप्रमाणें रेणु राजाला सांगून महादेव तेथून निघून गेले. पुढे रेणु राजानें अत्रि, वसिष्ठ, भार्गव, गालव, गौतम, कौंडिण्य, जैमिनी, ब्रह्मनंदन, मांडव्य, गर्ग, जाबालिक, शौनक, भारद्वाज, सम्यक, दाल्भ्य, देवल, विभांडक, वगैरे ऋषींना बोलावून, पुत्रप्राप्तीसाठी त्या यागासाठी अनेक विद्वान् व पवित्र असे ब्राह्मण आले होते, व पाहण्याकरितां गंधर्व, किन्नर, वगैरेहि आले होते. त्या यागाचे वेळीं पूर्णाहुती झाल्यावर यज्ञकुंडांतून एक तेज:पुंज व सर्वोगसुंदर कन्या निघाली, ऋषींनीं त्या कन्येला उचलून घेऊन राजाच्या मांडीवर बस विले व त्या कन्येला व राजाला आशीर्वाद दिला. देवांनींहि दुंदुभी वाजवून मोठा जयघोष केला, व त्या कन्येच्या उदरी भगवान् अवतार घेणार म्हणून तिच्यावर पुष्पवृष्टि केली. रेणु राजानें त्या कन्येचें नांव रेणुका असें ठेविलें, त्यानें आरंभिलेला याग यथासांग पूर्ण केल्यावर त्याला कांही दिवसांनीं एक पुत्र झाला, त्याच नांव त्यानें शूरसेन असें ठेविलें. यागाला आरंभ केला. ही अग्निकुंडांतून निघालेली रेणुका जगन्माता पार्वती व कश्यपाची स्त्री जी अदिती, या दोघींचा अवतार होय. एकदां पृथ्वीवर पाप फार झाले व लो- कांना दुष्टांपासून अत्यंत त्रास होऊं लागला. सर्व देवहि त्यामुळे फार त्रस्त झाले व ते ब्रह्मदेवासह क्षीरसागरी येऊन दुष्टांचा संहार करण्याकरितां शेषशाई नारायणाची प्रार्थना करून म्हणाले; “ हे देवाधिदेवा ! हे अनंता ! हे करुणाकरा ! हे जगन्निवासा ! हे दीनवत्सल प्रभो ! पृथ्वीवर दुष्टांनी अत्यंत