पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु [ स्तबक ऐकून महादेव ह्मणाले; "गीतमा ! तिनें मृत्युलोकीं यावें अशी तुझो इच्छा अस ल्यास तूं गंगेची प्रार्थना करून तिला प्रसन्न कर. " असे सांगून महादेव निघून गेले, मग गौतमऋषि गंगेच्या तपश्चर्येला बसले, त्यांनी हजार वर्षे गंगेची तप- श्रर्या केल्यावर गंगा श्वेतवस्त्र परिधान करून व सर्व अलंकारांनी अलंकृत होऊन गौतमापुढे येऊन उभी राहिली. ती पतितोद्धारिणी पवित्र मूर्ति पाहून गौतमानें तिच्या चरणावर मस्तक ठेवून तिला मृत्युलोकीं येण्याविषयों विनंति केली. तेव्हां गंगा ह्मणाली; " गौतमा ! मी तुझ्या इच्छेप्रमाणें मृत्युलोकी येईन, पण तूं पुन्हां महादेवास प्रसन्न करून त्यांची अनुमति पळीव." त्याप्रमाणें गौतमानें महादेवांची प्रार्थना केल्यावर ते प्रगट झाले व त्यांना आपल्या मस्त- कावरील एक जटा गौतमास दिली. ५ गौतमाचें आगमन. गौतमानें शंकराची जटा मिळविल्यावर ती ब्रह्मगिरीवर नेली व औदुंबराचे ढोलीत ठेविली, त्याबरोवर गंगेचा प्रवाह सुरू होऊन तो पश्चिम सागराकडे वाहूं लागला. तो वैतरणी या नांवाने प्रसिद्ध झाला. गंगेचा ओघ वास्तविक पूर्व सागराला मिळावा अशी गौतमाची इच्छा होती, पूण ओघ पश्चिमेकडे वाहूं लागला हे पाहून त्याची मोठी निराशा झाली. मग त्यानें गंगेची प्रार्थना करून तिला पूर्व सागराकडे जाण्याविषयी विनंति केली. त्यावेळी तेथे सर्व देव आले व त्यांनी तेथें स्नानें केलीं, त्या स्थळाला कोटीतीर्थ असें ह्मणतात. पुढे ती पूर्व सागराकडे वळली, परंतु पर्वतांत अदृश्य झाली. तेव्हां गौतमानें पुन्हां गंगेची प्रार्थना केल्यावर गंगा प्रगट झाली, पण पुढे पुन्हां अदृश्य झाली, तेव्हां गौतमास फार राग आला व त्यानें भूमीत पाताळापर्यंत दर्भ (कुश) घालून पाताळांतलें अमृत वर काढलें. तो अमृतरस दर्भा(कुशा)मुळे भूमीवर बाहेर आला, हाणून त्या ओघाला कुशावर्त असे ह्मणूं लागले. गौतमानें गंगा आणली ह्मणून तिला गौतमी अथवा गोदावरी अर्से म्हणूं लागले. ही गोदावरी ह्मणजे विष्णुचरणाचें अमृत होय त्या नदीत सिंहस्थसमयीं स्नान केल्यास यज्ञ करण्याइतकें पुण्य मिळतें. ती गोदा पूर्व समुद्राला सप्त मुखाने जाऊन मिळाली आहे. त्याप्रमाणेंच गंगेचा अंश जी वैतरणी ती ब्रह्मगिरीचे मागचे बाजूने निधून पश्चिम समुद्राला मिळाली. त्या वैतरणीचे कांठी एकवीस वेळां निःक्षत्रिय पृथ्वी करणारे परशुराम राहिले होते. याप्रमाणें पृथ्वीवर भगीरथ राजानें भागीरथी आपली व गोदा- वरी व वैतरणी ह्या नद्याहि तिच्याच अंशभूत आहेत. ह्या पुण्यपावन नद्या केवळ पतितांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या आहेत. "