पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२रें ] अध्याय १० वा. १३५ 66 ठेवून त्याला सर्व गणांचा राजा केला व त्याला सर्व विद्या व कला शिकविल्या. पुढे कांही दिवसांनी पार्वती गणपतीला ह्मणाली; " गणपती ! महादेव गंगेसर अनेक विलास करतात, हें मला पाहवत नाहीं, तर तिला कोणत्यातरी युक्तीनें महादेवाजवळून दूर कर, " तेव्हां गणपती ह्मणाला; आई ! यांत मोठेंसे कठीण असे कांहीं नाही, मी सांगतो तसे तूं कर. आपली जया या नांवाची जी. दासी आहे, तिला गाईचें रूप धारण करून पृथ्वीवर जाण्यास सांग. सांप्रत पृथ्वीवर मोठे अवर्षण पडले असून ते बारा वर्षे राहणारे आहे. या दुष्काळांत बद्रिकारण्यांतील ऋषि दंडकारण्यांत गौतम ऋषीच्या आश्रमांत जाऊन राहिले आहेत. तेथें गौतम ऋषि नित्य साळी पेरतात, त्या मंत्र बळानें बारा घटकेत तयार होतात मग त्या कांडून कुटून त्याचा भात करितात व त्यावर सर्व ऋषि आपले उपजीवन करीत आहेत. त्या साळीच्या शेतांत जयानें गाय होऊन जाऊन तेथल्या साळी खाव्यात, आणि ऋषीनें हांकलून दिल्यास प्राण सोडावा." गणपतीनं याप्रमाणे पार्वतीला सांगितल्यावर तिनें जयाला गायीचें रूप देऊन पृथ्वीवर पाठविलें. इकडे गणपतीहि गणेशभट्ट होऊन गौतमऋषीचे आश्र मांत येऊन राहिला. त्या गणेशभट्टाची विद्वत्ता पाहून सर्व ऋषि प्रसन्न झाले व त्यांनी त्याला मोठ्या सत्कारानें आश्रमांत ठेवून घेतले. पुढे ठरल्याप्रमाणे ती गाय रोज गौतम ऋषीच्या साळीच्या शेतांत येऊन साळी खाऊं लागली. दुष्का- ळाचे दिवस असल्यामुळे त्या नुकसानीबद्दल गौतम ऋषीला फार वाईट वाटले ब तो शेताच्या संरक्षणासाठी बसला. इतक्यांत रोजच्या प्रमाणें गाय येऊन साळी खाऊं लागली, तेव्हां गौतम ऋषि गायीजवळ जाऊन तिला लागला, तोच त्या गायीनें प्राण सोडला. गौतम ऋषीच्या हातानें याप्रमाणें गायीची हत्या झाल्यावर सर्व ऋषि मंडळी महापाप महापाप ह्मणूं लागले, गौतमाच्या आश्रमांत अन्नपाण्याला स्पर्श हिन करितां सर्व ऋषि आश्रमाबाहेर पडले, व गौतमाला प्रायश्चित्त घे असे झणूं लागले. तेव्हां गौतमानें गोहत्येला कोणतें प्रायश्चित्त आहे ते ऋषींनां विचारले. त्या सर्व ऋर्ष मध्ये गणेशभट्ट महा विद्वान होता; तो हाणाला, " गौतमा ! तूं जर शंकराच्या मस्तकावरील गंगा मिळविशील तर त्यायोगें या गोहत्येच्या पातफा- पासून मुक्त होशील. " गणेशभट्टानी असे सांगितल्यावर गौतम ब्रह्मगिरी पर्वतावर येऊन शंकराची तपश्चर्या करीत बसला. दोन सहस्र वर्षे कांहीएक न खातां एका अंगुष्ठावर गौतमानें एकनिष्ठपणे तपश्चर्या केल्यावर भगवान् महा- देव त्यास प्रसन्न झाले व काय इच्छित वर असेल तो माग, असें ह्मणाले. तेव्हां गौतम ऋषि हाणाला, हे कैलासपते ! मजकडून गोहत्या झाली आहे, त्या पापक्षालनासाठीं गंगा मिळावी अशी इच्छा आहे, गंगा मिळाल्यास माझा उद्धार होऊन अनेक लोकांचेंहि पापश्चालन होईल. " गौतमाचें हें मागणे