पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. १३४ [ स्तबक या नांवाचा तापसी याग करीत बसला होता, त्याच्या जवळून भागीरथीचा ओघ जाऊं लागल्यामुळे त्याचे दर्भ वगैरे सामान वाहून जाऊं लागले तेव्हां त्याने तो ओघ प्राशन केला. मग भगीरधराजानें जानूची प्रार्थना करून गंगा मागितली तेव्हां जानूनें आपला जानु ह्मणजे गुडघा करंगळीनें चिरला, त्यांतून गंगा खाली पडून पुढे वाहू लागली. म्हणून गंगेला जाह्नवी अर्सेही म्हणतात. झणून तिचें नांव भागीरथी असे सर्वत्र पडले. भगीरथ राजानें तें तीर्थ आपल्या सर्व पूर्वजांवर टाकून त्यांचा उद्धार केला. पुढे भागीरथी वहात जाऊन पूर्व सागराला सहस्र मुखांनी मिळाली. याप्रमाणे भगीरथ राजानें स्वर्गगंगा पृथ्वीवर आणिली, पण तिचा उपयोग ऋषि वगैरे करिनात. कारण ते गंगेला शंकराचें निर्माल्य तीर्थ समजूं लागले. मग स्वतः भगवान श्रीहारे सर्व देवांसह गंगाद्वारी आले व त्यांनीं भक्तिभावानें गंगेत स्नान केले. तेव्हांपासून गंगेचे सर्व दोप नाहीसे झाले असे समजून सर्व आबाल वृद्ध भागीरथीत स्नान, दान, जप, तप वगैरे करूं लागले. त्या गंगाद्वारालाहि तेव्हांपासून हरिद्वार असें ह्मणूं लागले. मकर राशीला रवि असतां या भागीरथीचं जो एक मासपर्यंत स्नान करील, त्याला शंभर यज्ञांचें फल मिळेल व त्याच्या सर्व पातकांचा नाश होईल, एवढंच नव्हे तर त्यावेळी मिळणारं पुण्य कधीहि संपणार नाही, असा या भागीरथीचा महिमा आहे. ४ गणपतीची उत्पति व त्याची युक्ती. भागीरथी प्रमाणेंच गोदावरीची उत्पत्ति आहे. एकदां महादेव स्नानासाठी गंगेवर गेले असतां पार्वतीसह स्नानाची इच्छा झाली व तिर्ने घरी स्नानाची सर्व तयारी करून ती स्नानाला बसली, आंत कोणी पुरुष येऊं नये झणून तिनें एक मानसपुत्र निर्माण करून त्याला दरवाजावर रक्षणासाठी ठेविलें व आंत कोणा पुरुषाला येऊं न देण्याविषयी तिनें बजाविलें. इकडे महादेव गंगेच्याकांटी स्नान करून जप करित बसले असतां गजासुर या नावाचा एक मदोन्मत्त राक्षस शंकराकडे आला व त्यानें आपल्या पायानें शंकराचा कमंडलू फोडून टाकला. तेव्हां शंकरास अत्यंत क्रोध आला व त्यानी आपल्या त्रिशूळानें राक्षसाला मारलं नंतर शंकरानें त्या राक्षसाचे कातडे काढून ते अंगावर परिधान केलें व कमंडलू ऐवजी त्याचें मुख घेऊन ते घरी आले, परंतु दारावर संरक्षणासाठी असलेला गण, त्यांना घरांत जाऊं देईना. तेव्हां महादेवांनां त्या गणाचा राग आला व त्यांनी आपल्या त्रिशूळाने गणाचें डोकें कापलें. इतक्यांत पार्वती स्नान करून बाहेर आली, तिनें तो प्रकार पाहिल्यावर ती महादेवाला ह्मणाली, "अहो ! दा मो माझे संरक्षणासाठीं पुत्र निर्माण केला होता, याचें डोकें तुझ निष्कारण कापल ! " तेव्हां महादेवाने आपल्या हातांतील गजासुर दैत्याचें मुख्य राणाचे धडावर बसवून त्याला जिवंत केले व त्याचें नांव महादेवांनी विघ्नेश असे