पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] अध्याय १० वा. १३३ राजानें गंगेची प्रार्थना करून तिला येण्याविषयीं सुचविलें. त्याबरोबर स्खगांतून धोधो करित गंगा आली. तिला महादेवानें आपल्या मस्तकीं धारण केले. समुद्र मंथनाचे वेळी वासुकीचें गरळ महादेवानें प्राशन केल्यामुळे त्याच्या शरिराचा दाह होत होता, तो मस्तकावर गंगा धारण केल्यामुळे नाहींसा झाला. याचं कारण गंगा ही भगवंताच्या चरणाचें तीर्थ आहे. ती शंकरानी मस्तकावर धारण केल्या- वर त्यांतून एक जवभर भगीरथराजाला दिली." २ भागीरथीची स्वर्गीत उत्पत्ति. तुला हे जनमेजय राजा, आतां स्वर्गात गंगेची उत्पत्ति कशी झाली, तें सांगतों. “ एकदां शंकर व पार्वती जवळ जवळ वसलीं होतीं, व त्यांच्या पासून थोडया अंतरावर बसून ब्रह्मदेव वेद पठण करीत होता; इतक्यांत वान्याच्या योगानें पार्वतीच्या अंगावरील वस्त्र उडून तिचे कांहीं अवयव ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडले. त्यामुळे ब्रह्मदेवाला कामोत्पत्ति होऊन रेत स्खलन झालें तें वीर्य भूमी- वर पडल्यावर ब्रह्मदेवाला मोठी लज्जा उत्पन्न झाली, व त्यानें तें वीर्य पायाने पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्या त्याच्या प्रयत्नाला यश न येतां त्या वीर्या पासून बालखिल्य वगैरे साठसहस मुळे निर्माण झाली. तो प्रकार पाहून सर्व देवांनी ब्रह्मदेवाला त्यानें मानसिक रीतीने जगन्माता अभिलाषिली म्हणून दोषी ठरविलें, व त्याला भायश्चित्त देण्याची ते तजवीज करूं लागले. तेव्हां देवांनी सर्व त्रिभुवनांतील तोर्थे, महान महान तपस्वी, मोठमोठे ऋषि, यांनां बोलावून त्यांनां आपआपला पुण्यांश देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या सर्वांनी पुण्यांश देऊन त्याचा एक कलश भरला. मग त्या कलशांतल्या पाण्यानें ब्रह्मदेवाला अभिषेक केला. त्यावेळी ब्रह्मदेवाजवळ असलेला कमंडलू त्या पाण्याने भरून गेला. पुढे बळीचे वेळां भगवान् श्रीहारे पाताळी जाऊन राहिले तेव्हां ब्रह्मदेवानें आपणाजवळ विष्णुपदाची स्थापना करून त्याची तो पूजा करूं लागला. त्या विष्णुपदावर त्याने आपल्या कमंडलूंत पडलेलें उदक घातलें तें उदक विष्णुपदा वरून वाहिल्यामुळे त्याला अधिक पवित्रता आली, व तो ओघ मंदाकिनी या नांवानें प्रसिद्ध झाला. ते विष्णुचरणाचें तीर्थ भगवानानें तिन्ही लोकी लोकांच्या पापक्षालनासाठी दिले आहे. स्वर्गात ही नदी मंदाकिनी या नांवानें, पाताळांत भोगावती या नांवाने व पृथ्वीवर भागीरथी या नांवाने प्रसिद्ध आहे. ३ हरिद्वार व जाह्नवी भगीरथराजानें जव मात्र गंगा महादेवाजवळून मागून घेऊन तो रथांत बसून निघाला, व त्याच्या मागे गंगाहि जाऊं लागली. तो वार्टेत हिमालय आडवा आला. मग भगीरथ राजानें इंद्राची प्रार्थना करून त्याचा ऐरावत मिळविला, व त्याच्याकडून पर्वत फोडून गंगेच्या ओघाला मार्ग केला. पुढें जानु ( जन्छु )