पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ कथाकल्पतरु. [ [स्तक्क त्या घोड्याचा शोध करीत करीत सगर राजाचे पुत्र हिंडत असतां त्यांना घोडा कोहि दृष्टीस पडेना. तेव्हां त्यांनी पृथ्वीला भोंक पाहून पाताळांत घोडा शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या पाडलेल्या भोंकांतून एकसारखें पृथ्वीवर पाणी येऊन जिकडे तिकडे जलमय होऊन गेलें. सगराच्या पुत्रांनी तो जलसंचय पृथ्वीवर आणला झणून त्याला सागर असें ह्मणतात; त्या पाडलेल्या विवरांतून सगराचे साठ सहस्र पुत्र पाताळांत गेले व तेथें घोड्याचा शोध करूं लागले, तो घोडा कपील महामुनीचे आश्रमांत बांधलेला दिसला. तेव्हां त्या राजपुत्रांनां - ऋषीनेंच घोडा बांधला, असा संशय आल्यावरून त्यांनी ऋषीला ओढले व घोडा चोरला- ह्मणून दोष देऊं लागले. त्या राजपुत्रांचा तो उन्मत्तपणा पाहून ऋषीला फार कोप आला व त्यानें ते साठ सहस्र राज- पुत्र जाळून टाकले. इकडे घोड्याचाही शोध नाहीं, व पुत्रही येत नाहीत, असे पाहून सगर राजा फार काळजीत पडला. त्या राजाचा असीमा नांवाचा नातू होता, त्याला शेवटों राजानें पुत्रांच्या शोधार्थ पाठविलें. तो असीमा शोध करीत करीत कपिल मुनीचे आश्रमी आला, तेव्हां तो घोडा व जळत असलेले पितर त्याच्या दृष्टीस पडले. मग त्या असी- मानें कपिल मुनीच्या चरणावर मस्तक ठेऊन त्यांची अनन्य भावानें क्षमा मागितली, व पितरांनां जिवंत करावें ह्मणून विनंति केली. त्या वेळी कपिल मुनी हणाले; "हे असीमा ! या तुझ्या पितरांचा उद्धार करण्यास एक स्वर्गातील गंगा मात्र समर्थ आहे. तिचे पाणी यांच्यावर टाकल्यास, यांची या अधःपातापासून मुक्ति होईल. " कपिल मुनीने अर्से सांगितल्यावर असीमा आपल्या नगराला परत आला व त्यानें झालेला सर्व प्रकार आपल्या पितामहाला निवेदन करून आपण गंगेच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करीत बसला. त्यानें अनंत वर्षे तपश्चर्या केली व शेवटा त्यांतच त्याचा अंत झाला, पण त्याला गंगेची प्राप्ति झाली नाहा. पुढे त्याचा पुत्र दिलीप गंगेच्या प्राप्तीसाठी तपश्चर्येला बसला. पण त्यालाहि गंगेची प्राप्ति न होतां त्याचाही तपश्चर्या करण्यातच अंत झाला. पुढे त्याचा पुत्र भगीरथ यानें एकनिष्ठपणें एक सहस्र वर्षे तपश्चर्या केल्यावर सालंकृत अशी एक शुभ्रवस्त्र नेसलेली व शुभ्र चोळी घातलेली पवित्र व शांत स्त्री त्याच्या स्वप्नांत आली व ती भगीरथाला ह्मणाली, "हे भगीरथा ! तुला मी प्रसन्न झाले आहे, व त्याप्रमाणं मी पृथ्वीवर येण्यासही तयार आहे, परंतु माझी गति सहन करण्याला योग्य अर्से पात्र पहा, हाणजे मी पृथ्वीवर येईन." असे सांगून गंगा अदृश्य झाली. मग भगीरथराजानें तपश्चर्येने महादेवास प्रसन्न करून घेतलें, व हाणाला, "भगवन् ! स्वर्गगंगेचा ओघ सहन करण्यास पृथ्वीवर योग्य असे पात्र नाही, तेव्हा ती आल्याबरोबर आपण तिला मस्तकी धारण करावी, " महा- देवाने 'तथास्तु' हाणून भगीरथ राजाची विनंती मान्य केली. तेव्हां भगीरथ