पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] अध्याय १० वा. झाला, जाण्यास व ती व स्वगत नेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण पतिद्रोहाच्या पातकामुळे ती देवलोकी असमर्थ झाली. पुढे त्या मोहिनीला नरक प्राप्त त्या भयंकर नरकांत कीटक होऊन पडली. स्वतः यमानें इंद्रानें तिला देवलोकाहून पाठवून तिची अशी दशा केली होती, पण त्यांना तिची सोडवणूक करितां येईना. तेव्हां ते विष्णूकडे गेले व तिची मुटका करा म्हणून म्हणूं लागले. पण विष्णूनेंहि ती गोष्ट अशक्य आहे असे कळविलें, व रुक्मांगदाकडे जाण्यास सांगितलें; त्याप्रमाणें यम व इंद्र रुक्मांगदा - कडे आले. तेव्हां रुक्मांगदानें एक। एकादशीचें पुण्य देऊन त्या मोहिनीची नरकांतून सोडवणूक केली; असें है एकादशीचे व्रत पुण्यकारक आहे. " अध्याय १० वा. गंगा व गोदा यांचें पृथ्वीवर आगमन १ भगीरथराजाचा प्रयत्न. एकादशीचें व्रत जसे पृथ्वीवर लोकांच्या उद्धारासाठी आले आहे, त्याच- प्रमाणें भागीरथी व गोदावरी ह्या नद्या लोकांच्या पापक्षालनासाठी स्वर्गाहून पृथ्वीवर आल्या आहेत. त्या पृथ्वीवर कशा आल्या, याविषयी जनमेजय राजाने वैशंपायनऋषींनी विचारल्यावरून, वैशंपायनऋषि त्या पुण्यपावन पवित्र नद्यांची कथा राजाला सांगू लागले. ते म्हणाले; " राजा! पूर्वी पंचकर्ण येथें बाहुक या नांवांचा एक सूर्यवंशी, अत्यंत उदार व धर्मशील राजा होऊन गेला. तो अकस्मात् मृत पावल्यावर त्याच्या स्त्रीनें अग्निप्रवेश करण्याचा विचार केला, व त्याप्रमाणे तिनें सिद्धता करून ती सिद्ध केलेल्या अग्नि- जवळ गेली; पण इतक्यांत उर्ग नांवाचा ऋषि तेथे आला व त्या स्त्रीला हाणाला; " हे स्त्रिये ! तूं गरोदर आहेस तेव्हां तुला अग्निप्रवेश करणें हैं निषिद्ध आहे. " ते ऋषीचे बोलणे ऐकून त्या स्त्रीनें अग्निप्रवेश करण्याचा विचार रहित केला व ती मंदिरांत परत आली. पुढे कांहीं काळ गेल्यावर ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचें नांव सगर असें ठेविलें. सगर, मोठा झाला व पुढे त्याला साठ हजार पुत्र झाले. कांही काळ गेल्यानंतर त्या मुलांनी बापाला अशी विनंति केली कीं, " आह्मी एवढे साठ सहस्र पुत्र तुझाला आहोत, तेव्हां तुझी अश्वमेध करा. " बापाने ती आपल्या मुलांची इच्छा पाहून मोठा संतोष दर्शविला व अश्वमेधाची सर्व तयारी करून एक सर्वोत्कृष्ट घोडा भूमंडळावर संचार करण्यासाठी सोडला. पुढे कांही दिवसांनी इंद्रानें तो घोडा धरला व कपिल ऋषींच्या आश्रमांत तो बांधून ठेवला. हा प्रकार कपिल ऋषींना मुलींच माहित नव्हता.