पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. ] अध्याय २ रा. अध्याय २ रा. वज्रनाभ राजाची कथा – १ ब्रह्मदेवाचें वरप्रदान. 66 जनमेजय राजा एके दिवशीं वैशंपायन ऋषीला ह्मणाला; मुनिवर्य वैशंपायन महाराज, श्रीकृष्ण परमात्मा निजधामास गेल्यावर मागे त्यांच्या वंशांत कोण कोण राहिले, तें ऐकण्याची मला इच्छा उत्पन्न झाली आहे, तर ही माझी इच्छा पूर्ण करण्याची आपण भजवर कृपा करावी. जनमेजय राजानें अशी विनंति केल्यावर वैशंपायन ऋपींना मोठा आनंद झाला व ते त्या राजाला हाणाले, "हे राजा जनमेजया, तुझी ही इच्छा पाहून मला फार संतोष झाला आहे. हे राजा, ईश्वराचे लीलालाघव हें फार मनोरम व मंगलकारक असे आहे. श्रीहरीच्या कथा सांगतांनां मनाला मोठा आनंद वाटतो. त्यांतून कथा ऐकणारा श्रोता श्रद्धावान, ज्ञाता व सावधान असा असला ह्मणजे श्रीहरीचे गुणानुवाद गाण्यास अधिक स्फूर्ति उत्पन्न होते. शिवाय अशा श्रोत्यांचें शंकासमाधानही लवकर करितां येतें. तुझ्यासारखा चतुर व ईश्वरभक्तिपरायण श्रोता मला मिळाला, हा लाभ अलभ्य असाच आहे; तूं विचारलेली कथा तुला कथन करितों, ती शांत चित्तानें श्रवण कर. द्वापर युगाचे शेवटी यादव अत्यंत उन्मत्त होऊन त्यांच्यांत सर्वत्र यादवी माजली. त्यावेळी यादवांनी अनेक निंद्यकृत्यें केली व त्यामुळे सर्व यादवांचा नाश झाला. परंतु सांब व मदन हे दोघे श्रीकृष्णाचे पुत्र त्या प्रसंगांतून वांचले; कारण ते दोघेहि चिरंजीव होते. तसेच श्रीकृष्णाचा सापत्न बंधु जो गद तोहि त्या प्रसंगांतून वांचला; कारण तोहि चिरंजीव होता. असें सांगतात कीं, हे तिघेहि यादव कुलदीपक, चिरंजीव असल्यामुळे अद्यापपर्यंत सुवर्णमेरु पर्वतावर वज्रपुरी ह्मणून जे प्रसिद्ध नगर आहे, त्या नगरांत राज्य करीत आहेत. पूर्वी या वज्रपुरीचा राजा, वज्रनाभ या नांवांचा होता. त्या राजाला मारून टाकून या तिघांनीं तें राज्य मिळविले आहे. वज्रनाभ राजाला प्रभावती या नांवाची एक सुंदर मुलगी होती, ती मदनानें आपणास स्त्री केली होती; व त्या प्रभा- वती मुळेच तें राज्य या तिघांनां प्राप्त झालेले आहे. " ही वैशंपायन ऋपीनी सांगितलेली त्रोटक हकीकत ऐकून जनमेजय राजाला वज्रनाभाची संपूर्णकथा ऐकण्याची इच्छा झाली; तो वैशंपायन ऋषीला म्हणाला; मुनिवर्या, आपण सांगितलेल्या वरील माहिती वरून मला वज्रनाभाची कथा ऐकण्याची इच्छा झाली आहे, तर ही कथा मला आपण सांगावी. याप्रमाणे जममेजय राजानें इच्छा दर्शविल्यावर वैशंपायन ऋषि राजाला ती कथा सांगू लागले. ते हाणाले;