पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक १३० माणे माझ्या शरीराचा उपयोग तुझांसाठी झाल्यास त्यांत माझे कल्याणच आहे.. यावेळी आपण माझा मोइ सोडून देऊन व्रताचें रक्षण करावें अशी माझी आपणास विनंति आहे. " पुत्राचें हें वोटणें ऐकून राजानें व्रताचें रक्षण कर ण्याचा निश्चय केला, व पुत्राचा वध करण्याचे ठरविले. राजा मोहिनीला ह्मणाला, मोहिनी ! हा माझा धर्मागद पुत्र मी माझ्या व्रताचें संरक्षणासाठी तुझ्या स्वाधीन केला आहे; तूं याचें शिर तोड अथवा वाटेल तें कर. तेव्हां मोहिनी म्हणाली; "राजा ! ज्याला भोजनाला बोलावतात त्याला कोणी शिधा घेऊन ये असे सांगत नाहीं; किंवा देवाच्या पूजेसाठी, देवालाच कोणी फुले घेऊन ये, असे सांगत नाहीं; तुला जर आपले व्रत राखावयाचे असेल, तर स्वतःच्या हातांनें मुलाचें शिर तोडून तें मला दे. " हैं मोहिनींचं कटु वाक्य ऐकून राजाला फार दुःख झाले; पण त्यानें व्रत सोडावयाचें नाकारले नाहीं. तो पुत्रवधाला उद्युक्त झाला. राणी संध्यावळीनें, राजाला व्रतासाठी पुत्रवधास अनुमति दिली, व तिनें मुलाला अभ्यंग स्नान घालून त्याच्या अंगाला चंदन लावले; गळ्यांत तुळशीच्या माळा घातल्या; त्याचेकडून श्रीहरीला नमस्कार करविला आणि मग तिनें त्याला राजासमोर आणून उभा केला. धर्मोगदानें आईबापांच्या चरणावर मस्तक ठेवून जन्मोजन्मीं संध्यावळीसारखी आई व रुक्मांगदासारखा वाप मिळावा अशी श्रीहरीची विनंति केली, व तो बापापुढे मान करून उभा राहिला. राजानें म्यानांतून तरवार काढून ती स्वच्छ पुसली, व श्रीहरीचें चिंतन करूं लागला. तो विलक्षण प्रकार पाहण्यासाठी आकाशांत देव विमानांत बसून आले होते. नारदाचे कानावर ती गोष्ट गेल्यावर तो विष्णूकडे गेला व विष्णूला ह्मणाला, 'हे देवाधिदेवा नारायणा ! तुझें व्रत करीत असतां त्या तुझ्या धर्मागदावर कोण प्रसंग आला आहे, त्याची तुला दादहि नाही; त्याचा बाप व्रताच्या संरक्षणासाठी त्याचा वध करीत आहे, तर हे जगजेठी, आतां विलंब न करितां कांतीनगरास जाऊन त्या पुण्यशील धर्मागदाचें रक्षण कर. 66 नारदानें श्रीहरीची याप्रमाणे करुणा भाकल्यावर त्या भक्तवत्सल प्रभूला धर्मोगदाची दया आली व तो मोठ्या त्वरेनें कांतीनगरास येऊन आतां रुक्मां- गद धर्मोगदाचे मानेचर तरबार घालणार; तींच त्यानें रुक्मांगदाचे हात मागून धरले. सर्व लोक पाहतात, तो शंखचक्रगदापद्मधारी भगवान् विष्णु साक्षात् उभे आहेत. त्या एकादशीच्या व्रतामुळे त्यावेळी नगरांतील सर्व आबालवृद्धांना श्रीहरीचे दर्शन झाले. मग राजानें श्रीहरीचे चरण धुवून तें तीर्थ सर्वांनां दिलें. इतक्यांत बैकुंठाहून इजारी विमानें आली, त्या विमानांत श्रीहरीनी सर्वांना बसवून बैकुंठास नेले. मागें फक्त मोहिनी तेवढी राहिली. या एकादशीच्या व्रतामुळे सर्व कांतीनगरचे लोक सदेह वैकुंठास गेले. तो प्रकार पाहून इंद्रादि देवांची मोठी फजिती झाल्यासारखे झालें, त्यांनी मोहिनीला वर