पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

11 अध्याय ९ वा. २रें ] १२९ आपल्या ती झोपेत असतां एका राक्षसानें तिला दुष्टबुद्धीनें अरण्यांत आणले होतें. त्या वेळीं तो राक्षस निद्रिस्थ असून, ती राजकन्या सुटकेचा मार्ग शोधीत होती; इतक्यांत तुझा पति तिच्या दृष्टीस पडला, तेव्हां ती त्याला ह्मणाली, हे ब्राह्मणा, या राक्षसाचा नाश करून तूं माझा स्वीकार कर. राजकन्येच्या त्या विनंतीप्रमाणें तुझ्या पतीने त्या राक्षसाचा त्रिशूळ घेऊन त्याचा नाश केला व त्या राजकन्येचा स्वीकार केला. पुढे ती राजकन्या तुझ्या पतीला आपल्या बापाकडे वेऊन गेली, व त्याला तिनें झालेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हां राजानें तुझ्या पतीचा सत्कार करून राजकन्येबरोबर त्याचें लग्न केले व आपले सर्व राज्य जांवयास दिलें. पुढे तुझ्या पतीनें तुला आपल्या- जवळ आणून तुझी बरदास्तही राणीप्रमाणे ठेविली. पुढें कांही दिवसांनीं तुला • मरण प्राप्त झाल्यावर यमदूतांनी तुला नरकांत नेऊन टाकले; तेथें तुझी अत्यंत हालअपेष्टा झाल्यावर मग तुला बेडकुळीचा जन्म प्राप्त झाला; त्या स्थितीन तूं शंभर वर्षे हाल अपेष्टा भोगल्यावर एका कावळ्यानें तुला मारलें; नंतर तूं ह्या जन्मास आलीस. आतां यापुढे तुला कोणती शिक्षा होणार आहे, व कोणता जन्म प्राप्त होणार आहे, ते मला माहित नाहीं. असें त्या कावळ्यानें त्या अळीला सांगून तिला तो यमलोकी घेऊन गेला. ५ धर्मागदाचा शिरच्छेद " राणी संध्यावळीने त्या मोहिनीला अळीचे उदाहरण देऊन पुष्कळ उप- देश केला, परंतु मोहिनीनें तिकडे मुळींच लक्ष दिलं नाहीं. ती राजावर क्रुद्ध होऊन ह्मणाली, " राजा ! तूं मला भाष्यदान दिले आहेस, त्याप्रमाणे या एकादशाच्या व्रताचा त्याग कर, किंवा ते व्रत तुला सोडावयाचे नसल्याम • तुझा मुलगा जो धर्मांगद त्याचे शिर मला दे; आणि ह्या दोन्हीही गोष्टी तुला पसंत नसतील तर मी तुझ्या घरी अन्न ग्रहण करणार नाही. मोहिनचे ते निर्वाणीचे उद्गार ऐकून राजा मोठ्या संकटांत पडला. त्याला त्या वेळीं काम करावें तें सुचेना. मुलाचा वध करावा तरी तें अनिष्टच; बरें व्रत सोडावें तर नरकाची प्राप्ति होणार अशा अडचणीत राजा सांपडल्यावर त्याचा मुलगा धर्मोगद राजाकडे आला व राजाला ह्मणाला, बाबा ! माझे शोर मी मोहिनीला देण्याला आनंदाने तयार आहे; पण आपण हें एकादशीचं व्रत कदापि सोडूं नये. बापासाठी मुलाने आपला प्राण खर्ची घालणे यांन विशेष असें कांहींच नाहीं. पित्याच्या आज्ञेप्रमाणे रामलक्ष्मणानें राज्याचा वनवास पत्करला; श्रावणानें बापासाठी प्राणत्याग केला; पुंडलिकानें आपले सर्व आयुष्य आईबापांच्या सेवेंत खर्चिलं; निलयाने बापासाठी शरीर देऊन शंभूला संतोषित केलें, पुरूने पित्याच्या कल्या णासाठी बापाची जरा घेतली; भीमानें आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारिलें; त्याम त्याग करून