पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ [ स्तबक मीहि उपाशी राहीन. राजानें मोहिनीच्या बोलण्याकडे मुळींच लक्ष न देतां श्रीहरीचें भजन, पूजन, जागरण, कीर्तन, वगैरे करून एकादशीचें व्रत केले, दुसरे दिवशीं द्वादशीची पारणा करण्यासाठी राजानें उत्तम प्रकारच्या भोज- नाची तयारी केली, त्यावेळी राजानें सहस्र ब्राह्मणांना भोजनाला बोलावून त्यांना सहस्र गाई दिल्या व दक्षिणा वगैरे देऊन त्यांचा योग्य सत्कार केला आणि नंतर आपण भोजनास बसला. नंतर स्त्रियांची जेवणाची तयारी झाली, पण मोहिनी रागावली होती ती जेवणासाठी मुळींच उठेना, राणी संध्यावळीने व कुमार धर्मागदानें तिची पुष्कळ समजूत केली, पण ती मोहिनी मुळींच ऐकेना. . तिला संध्यावळी झणाली, "बाई मोहिनी ! पतीवर स्त्रीनें रागावणे हा स्त्रीचा धर्म नसून ती नरकाची सामग्री मात्र होय, पति हेंच स्त्रीचें दैवत होय, पतीला असंतुष्ट करणें हे मोठें पातक होय, स्त्रीनें नेहमीं पतीची पूजा करून पतीचे आज्ञेत रहावें, मुलाला आईबाप हेच देव आहेत, सेवकाला स्वामी द्दाच देव, त्याचप्रमाणे स्त्रीला पति हाच देव आहे, तर हे मोहिनी ! तूं व्यर्थ पतिद्रोह करून अळीप्रमाणे दंड भोगूं नकोस. " ४ अळीची कथा. कथाकल्पतरु. 66 66 रुक्मांगदाची कथा सांगत असतां अळीचा वृत्तांत आला, तेव्हां तो ऐक- ण्याची जनमेजय राजानें इच्छा दर्शविली, व वैशंपायन ऋषि अळीची गोष्ट सांगू लागला. एका झाडामध्यें एक अळी पांचशे वर्षेपर्यंत होती, पुढे सुतारानें. करवत घालून तें झाड कापलें, तेव्हां ती अळी त्या झाडाच्या गर्भातून बाहेर पडली. ती अळी बाहेर पडल्याबरोबर एक कावळा आला व त्यानें तिला चोंचींत धरून आकाशांत उड्डाण केलें. त्या कावळ्याची नखें लागून व त्याची चोंच लागून त्या अळीला फार त्रास होऊं लागला, तेव्हां ती त्या कावळ्याला काणाली, बा कावळ्या ! तूं कां माझा छळ करितोस ? " त्यावेळी कावळा ह्मणाला; " बाई अळी ! मी यमाचा किंकर असून त्याच्या आज्ञेप्रमाणे तुला त्रास देत आहे. हे एवढे कष्ट तूं पतिद्रोहामुळें भोगीत आहेस. तूं पूर्वी ब्राह्मणाची स्त्री असून तुझा पति काशी देशचा राहणारा होता. तो जुगारी असल्यामुळे त्यानें एकदां द्युतांत सर्व द्रव्य गमावलें, तेव्हां द्युतांतील इतर लोक त्याच्याजवळ पैसे मागूँ लागले, पण पैसा नसल्यामुळे तो आपल्या देणेकऱ्यांनां तुझ्याकडे घेऊन आला च तुझ्या अंगावरील दागीने दे, असे म्हणूं लागला; पण तूं त्याला दागीने न देतां म्हणालीस, हे सर्व दागीने माझ्या माहेरचे आहेत; पतीचें असें फक्त अ ही गळसरी आहे, ती घ्या, असें म्हणून तूं ती गळसरी रागानें तोडून टाकिलीस; तेव्हां त्या देणेकऱ्यांनी तुझ्या पतीला फार मारले, तरी तुला त्याची दया आली नाहीं, पुढे तुझा पती त्या सावकारांच्या धाकानें अरण्यांत पळून गेला. तेथे तिची व एका राजकन्येची गाठ झाली, ती राजकन्या काशीराजाची असून