पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें ] अध्याय ९ वा. १२७ 66 या व्रतानें सहज नरक चुकवितील." हे ऐकून इंद्रानें मोहिनी नांवाच्या एका स्त्रीला रुक्मांगद राजाकडे जाऊन या एकादशी व्रताचा नाश करण्यास सांगितले. ती मोहिनी कांतीनगरास आली व तिनें एका उपवनांत रुक्मांगद राजाची भेट घेतली. ती स्वर्गातील अनुपमेय सुंदर स्त्री पाहून राजाला तिचें मोठें आश्चर्य वाटलें. तो तिला ह्मणाला, हे स्त्रिये ! तूं कोणाची स्त्री आहेस आणि अशा तारुण्यावस्थेत अशी एकटी कां हिंडतेस ?" राजाचा हा प्रश्न ऐकून ती स्त्री ह्मणाली; " हे राजा ! मी देवकन्या असून, अद्यापि माझा विवाह व्हावयाचा आहे, पृथ्वीवर कोणी योग्य पति मिळाल्यास त्याच्याबरोबर विवाह करण्याचा माझा विचार आहे. " तेव्हां तो रुक्मांगद राजा ह्मणाला; " हे मोहिनी ! जर मजबरोबर विवाह करशील तर मी आपणास मोठा भाग्यवान् मानीन. " यावर मोहिनी हाणाली; राजा ! मला जो भाष्यदान देईल त्याच्या बरोबर मी लग्न करीन, तेव्हां तूं माझें सांगण्याप्रमाणे वागण्याचें कबूल करीत असल्यास मी तुजबरोबर विवाह करितें. " राजानें तिच्या ह्मणण्याप्रमाणे तिला भाष्यदान दिलें व तिजबरोबर विवाह करून तिला नगरांत घेऊन आला. त्या तारुण्यलतिकेच्या सहवासांत असतां राजाला एकादशीचे व्रताचा विसर पडला, व तो अक्षय्य मोहिनीचे महालांत बसून ऐपआराम करूं लागला. राजा याप्रमाणे मोहिनीचे नादी लागला होता, तरी त्या राजाचा मुलगा धर्मोगद तें एकादशीचें व्रत नियमानें करून आपल्या सर्व प्रजाजनांकडू- नहि करवी. अशा रीतीनें शतसंवत्सर गेल्यावर एका दशमीचे दिवशीं दुपारी नगरांत दवंडी देणारे लोक दवंडी देत होते, तिकडे राजाचें लक्ष गेले. त्यावेळी मोहिनीनें उत्तम प्रकारचा तांबूल तयार करून, तो राजाच्या हाती दिला होता; राजानें तो तांबूल आतां भक्षण करावा इतक्यांत तो दवंडी देणारा रस्त्यांतून मोठ्यानें ओरडला कीं, आज दशमी आहे, तेव्हां सर्वांनी एकभुक्त रहावें उदईक एकादशी आहे, तर उद्यां कोणींहि अन्न ग्रहण करूं नये, सर्वांनी निरशन करावें, गुरांना गवत आणि लहान मुलांना मातेनें स्तन देखील देऊ नये." अशी दवंडी देऊन तो दवंडी देणारा पुढे निघून गेला. राजानें ते शब्द ऐकल्यावर त्याला त्या व्रताची आठवण झाली, व आपण आजवर तें बत केलें नाहीं, याबद्दल त्याला फार पश्चात्ताप वाटू लागला. त्यानें हातांतला विडा फेंकून दिला आणि तो पलंगावरून उठून खाली बसला. तेव्हां मोहिनी झणाली, " हे राजेंद्रा ! एकाएकी माझ्या जवळून उठून आपण भूमीवर कां बसलांत ?" राजा ह्मणाला, "उदईक एकादशी आहे, ते महाव्रत मला करा- वयाचें आहे. तेव्हां आतां मी एकभुक्त राहून द्वादशीपर्यंत भोगविलास कांहीं- एक करणार नाहीं." हें ऐकून मोहिनी राजाला ह्मणाली, " राजा ! तूं मला भाष्यदान दिले आहेस, तेव्हां माझ्या आज्ञेवांचून तूं जर हैं व्रत करशील तर.. 66