पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ कथाकल्पतरु. [ स्तवक वाढावी, आणि माझी कीर्ति व्हावी असा मला कांहीं वर दे." तेव्हां भगवान् ह्मणाले," जो एकादशीचें व्रत करील त्याला वैकुंठाची प्राप्ति होईल, व जो त्या दिवशी उपवास न करितां अन्न भक्षण करील, त्याला नरकाची प्राप्ति होईल. " तेव्हांपासून हें एकादशीचें व्रत स्वर्गात चालले आहे. हें करण्याची रीत अशी आहे कीं, दशमीचे दिवशीं एकभुक्त राहून एकादशीचे दिवशीं निरशन करावें. व द्वादशीचे दिवशीं प्रभातकाळी पांच घटका दिवसास भोजन करावें. हें व्रत जो नियमानें सतत करील, त्याच्या पुण्याला गणती राहणार नाहीं. तर राजा ! असा कोणी एकादशी करणारा असेल, तर त्याच्या स्पर्शानें हें विमान चालू होईल. " रुक्मांगदाचे राज्यांतच काय, पण संपूर्ण पृथ्वीवर त्या वेळीं तें व्रत कोणीहि करणारा नसल्यामुळे राजानें असा कोणी मनुष्य येथे मिळणार नाहीं असें सांगितलें. तेव्हां एक इंद्रदूत ह्मणाला; "राजा ! आजची द्वादशी आहे. कालची एकादशी होती, जर कोणी काल कांहीं कारणामुळे उपवासी राहिला असेल व त्यानें अद्यापपर्यंत भोजन केले नसेल, तर त्याच्या हातानें देखील विमान चालू होईल." मग राजाने त्याप्रमाणे शोध करण्यास नगरांत आपले अनेक सेवक घाटविले, तेव्हां एक स्त्री पति रागावल्यामुळे दशमीचे सायंकाळपासून द्वादशीचे सकाळपर्यंत उपवासी होती, तिला घेऊन एक सेवक राजाकडे आला. तेव्हां राजानें तिला तें पुण्य खर्ची घालावयाला सांगून विमानाला हात लावण्यास सांगितलें. त्याप्रमाणे त्या स्त्रीनें विमानाला हात लावतांच विमान एकाएकी वर उडालें व आकाश मार्गानें स्वर्गी निघून गेलें. हा चमत्कार पाहून राजाचे हृदयांत एकादशीचे व्रताविषयीं श्रद्धा उत्पन्न झाली व तें व्रत आपले राज्यांत पशु, पक्षी व मुलाबाळांपासून तो अत्यंत वृद्धापर्यंत सर्वांनीं करावें असा त्यानें नियम केला. त्या राजाची प्रजा, राजाप्रमाणेच धर्मरत असल्यामुळे दुसऱ्या एकादशीपासूनच त्याच्या राज्यांत तें व्रत सर्व आबालवृद्ध करूं लागले.. एकादशीचे दिवशी रात्री जागरण करून कीर्तन करावें, श्रीहरीचें भजन करावें, याप्रमाणे सर्वत्र तें व्रत सुरू झाले. ब्राह्मणापासून तो अंत्यजापर्यंत तें व्रत कर- घ्याची कोणाला आडकाठी नसल्यामुळे सर्व लोक तें व्रत करूं लागले. ३ रुक्मांगद व मोहिनी. रुक्मांगदाचे राज्यांत एकादशीचें व्रत सुरू होऊन कांहीं वर्षे झाल्यावर यमाचा कुंभीपाक रिकामा पडला, जो कोणी रुक्मांगदाचे राज्यांत मृत्युवश होई, त्याला विष्णूचे दास उचलून वैकुंठीं नेऊं लागले. हा प्रकार बघून सर्व देवांना मोठी काळजी पडली, यम इंद्राला ह्मणाला; "इंद्रा ! लोकांना हें फुकटचें एका- दशीव्रत माहित झाल्यापासून माझा कुंभीपाक अगदी रिकामा पडला आहे. म्हां याला कांहीं तरी उपाय योजिला पाहिजे. नाहीं तर हे महान् महान् प्रातर्क ह