पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय ९ वा. १२५ १ दूत ह्मणाला, "राजा ! आह्मी इंद्राचे दूत असून ही फुलें देवेंद्राच्या आज्ञेप्रमाणे आह्मी घेऊन स्वर्गात नेतों, तेथें तीं सर्व देवांना मिळतात." हे ऐकून रुक्मांगद राजाला आपली फुले स्वर्गात देवांच्या मस्तकावर जाऊन पडतात, याबद्दल फार धन्यता चाटली. मग त्यानें त्या दूतांना अलंकारवस्त्रे वगैरे देऊन त्यांचा योग्य सत्कार केला व कांहीं फुलें आह्मांस देवपूजेसाठी ठेवीत जा, आणि कांहीं घेऊन जात जा, असे सांगून रुक्मांगदानें त्या इंद्राच्या दूतांना जाण्यास निरोप दिला. तेव्हां तो दूत राजाला पुन्हा ह्मणाला; रुक्मांगदा ! तूं जाण्यास निरोप दिलास खरा. पण आतां आमचें विमान चालणे अशक्य झाले आहे, तें पृथ्वीस लागल्यानें पृथ्वीवरील पापपरिमळानें दूषित झाले आहे. कोणी एकादशीचें पुण्य देईल तर हैं भूमीवरून वर जाईल. " तें त्या दूतांचें बोलणें ऐकून रुक्मांगद राजाला फार आश्चर्य वाटलें, त्याला एकादशीचें व्रत ह्मणजे काय, तें त्या वेळेपर्यंत माहित नव्हतें, ह्मणून त्या राजानें त्या दूताला एकादशीचें व्रत ह्मणजे काय व त्याची उत्पत्ति कशी ते सांगण्याविषयी विनंति केली. ती राजाची विनंति ऐकून इंद्राचा एक दूत राजाला एकादशीच्या व्रताची कथा सांगू लागला. तो दूत ह्मणाला; राजा ! कुश राक्षसाचा मुरु या नांवाचा एक बंधू होता, कुशाला श्रीहरीनें मारल्यावर मुरुला त्याबद्दल फार कोप आला व तो विष्णूचा नाश करण्याचा प्रयत्न करूं लागला. त्या मुरु राक्षसानें कैलासपतीची कित्येक वर्षे तपश्चर्या करून त्याला प्रसन्न केलें, व त्याच्याकडून असा चर मिळविला कीं, मी विष्णूला जिंकावें व मला पुरुषाच्या हातानें मरण येऊं नये. महादेवाकडून असा वर मिळविल्यामुळे तो मुरु राक्षस अत्यंत उन्मत्त होऊन विष्णूला त्रास देऊं लागला. तेव्हां विष्णुहि त्या राक्षसाचा नाश कर ण्याचा प्रयत्न करूं लागला, परंतु तो दैत्य त्याला मुळींच आटोपेना. त्या राक्षसाबरोबर कित्येक वर्षे युद्ध केल्यावर प्रभु अत्यंत लांत झाले व ते रण- भूमीवरून गिरिकंदरांत जाऊन तेथें स्वस्थ निजले, दहा सहस्र वर्षे युद्ध केल्यामुळ झालेला शीण प्रभूंनीं श्वासमार्गाने बाहेर टाकला व ते निद्रिस्त झाले. प्रभूनें टाकलेल्या श्वासापासून एक सुंदर, सर्व अवयवांनी पूर्ण, अशी कन्या उत्पन्न झाली. तिनें श्वेतवसन परिधान केले असून तिला चार हात होते. एका हातांत तल- चार, एका हातांत ढाल व दोन हातांत धनुष्यवाण अशीं तिचीं आयुधे होतीं. विष्णु तेथे निद्रिस्त झाल्यावर त्यांच्या मागोमाग तो मुरु दैत्य त्यांना त्रास देण्यासाठी आला. पण इतक्यांत ती स्त्री त्या दैत्याला आडवी झाली, व तिनें त्या राक्षसाबरोबर युद्ध करून त्याचा नाश केला. त्यावेळी सर्व देवांना आनंद होऊन त्यांनी त्या स्त्रीवर पुष्पवृष्टि केली. त्या दिवशी एकादशी अस ल्यामुळे त्या स्त्रीला सर्व एकादशी असें हाणूं लागले. भगवंतहि तिला पाहून प्रसन्न झाले. ती त्या भक्तवत्सल प्रभूला ह्मणाली, " हे अनंता ! तुझी भक्ति