पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक त्या शहरा प्रत्येक दिवशी आपआपल्या देवतेला एक लक्ष अत्यंत सुंदर व सुवासिक पुष्पें वाहणारे हजारों लोक होते. त्याप्रमाणें तो रुक्मांगदराजाहि प्रभातकाळी उठून स्नानसंध्या करून श्रीहरीची पूजा करी व पूजेच्या वेळीं एक लक्ष पुष्पें श्रीहरीला भक्तीनें अर्पण करीत असे. तो रुक्मां- गदराजा व त्याची प्रजा धर्माचरणानें वागून आनंदानें कालक्रम करीत असतां, तो प्रकार एकदां नारदाचे अवलोकनांत आला, तेव्हां नारदाला अत्यंत आश्चर्य वाटून या रुक्मांगद राजानें वैकुंठालाहि लाजविलें असें तो मनांत हाणाला. नंतर तो तेथून अमरावतीस इंद्राकडे गेला. तेव्हां इंद्रानें नारदाला आपल्या नंदनवनांतली कांहीं पुष्पे दिलीं; ती फुले पाहून नारद इंद्राला ह्मणाला, " इंद्रा ! तुला आपल्या नंदनवनाचा व त्यांतील पुष्पांचा मोठा अभिमान आहे; पण पृथ्वीवर रुक्मांगद राजाचे राज्यांत तुझ्या नंदन- वनापेक्षांहि सुंदर उपवनें असून त्यांतील फुलेंहि अप्रतिम अशीं आहेत." तें नारदाचें बोलणे ऐकून इंद्रानें आपले दूत विमानांत बसवून कांति नगरच्या उपवनांत फुलें तोडण्यासाठी पाठवून दिले. कांही वेळानें दूतांनीं इंद्राने सांगि- तल्याप्रमाणें कांति नगरच्या उपवनांतील पुष्कळ फुलें तोडून आणून इंद्रापुढें ठेविलीं; तीं अप्रतिम फुले पाहून इंद्राला फार आनंद झाला व त्याला नारदाचें बोलणें खरें वाटलें. इंद्रानें आपल्या दूतांना त्यावेळी अशी आज्ञा दिली की, तुझी प्रत्यहीं प्रभातकाळी कांति नगरास जाऊन तेथील सर्व फुलें तोडून आणा. इंद्राच्या या आज्ञेप्रमाणें इंद्राचे दूत रोज कांति नगरास जाऊन तेथील बागें- तील फुलें अमरावतीला नेऊं लागले. २ एकादशी व्रतोत्पत्ति. इकडे कांति नगरांतील फुले याप्रमाणे स्वर्गात जाऊं लागल्यावर तेथील लोकांना देवाच्या पूजेसाठी फुले मिळेनाशी झाली. राजानें आपल्या माळ्यांना बोलावून आणून अलीकडे फुले कां नाहींत हाणून विचारलें; तेव्हां माळ्यांनी कोणी चोर विमानांत बसून बागेत येतात व फुलें तोडून पुन्हां विमानांत बसून पळून जातात असा प्रकार कळविला. हें ऐकून राजाला फार आश्चर्य वाटलें. मग त्यानें आपल्या दूतांना कांहीं तरी युक्तिप्रयुक्ति करून ते चोर धरावेत ह्मणून सांगितलें. विमानाचे खाली वांग्याच्या लांकडांचा धूर केला झणजे विमान खाली पडतें, असा शोध राजाच्या माळ्यांना लागल्यावर त्या माळ्यांनी बागेतून विमान जाऊं लागले तेव्हां ती लांकडें पेटवून त्यांचा धूर विमानाचे खाली केला. त्याबरोबर, तें इंद्राचे विमान पृथ्वीवर पडलें; मग राजाच्या माळ्यांनी त्या दूतांना धरून राजापुढे नेऊन उभे केलें; त्या दूतांच्या त्या दिव्य च सुंदर आकृति पाहून राजाला फार आश्चर्य वाटले, त्यानें त्या दूतांना आसने बसावयाला देऊन तुह्मी कोण, कोठील, वगैरे माहिती विचारली, तेव्हां इंद्राचा