पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ कथाकल्पतरु, [ स्तबक संगमावर कपालेश्वर या नांवां राहिले, व गोदावरीला असा वर दिला कीं, गुरु, सिंह राशीला आल्यावर तुला सर्व तीर्थांची महती प्राप्त होईल, व तुझ्या स्नानामुळे लोक पातकापासून मुक्त होतील. १ ४ ऋषीचा सत्कार. साला भगवान् ह्मणाला; दुर्वास ऋषींनी श्रीहरीचरणीं मस्तक ठेवून प्रार्थना केल्यावर दुर्वा- दुर्वासा ! माझ्याहून माझे भक्त थोर आहेत. त्यांच्या भक्तीमुळे मी त्यांचा दासानुदास होऊन त्यांची सेवा शुश्रूषा करितो, मी एवढा विराट पुरुष, पण माझ्या भक्तांनीं भक्तीमुळे मला आपल्या हृदय- कपाटांत कोंडून ठेविलें आहे, यावरून ते मजहून थोर असून मजपेक्षांहि शक्ति - शाली आहेत. भक्तीमुळे त्यांनी मला बांधून टाकले आहे. तर तूं माझा भक्त जो अंबरीष, त्याच्याकडे जाऊन त्याची क्षमा माग, ह्मणजे तो तुझी या संकटांतून सुटका करील. " भगवंतानें असें सांगितल्यावर दुर्वास तेथून निघाला व अंबरीष राजाकडे गेला. इकडे अंबरीष राजाहि ऋषि न जेवतां निघून गेला म्हणून एक संवत्सरपर्यंत उपवासी होता. ब्राह्मण आपल्या घरांतून उपाशी गेला तेव्हां तो जेवावयाला येईपर्यंत अन्न ग्रहण करा- चयाचें नाहीं, असा निग्रह करून अंबरीषराजा दुर्वास ऋषीची मार्गप्रतीक्षा करीत बसला होता, अशा स्थितीत राजा असतांना दुर्वासऋषि एकाएकी आला व राजाच्या पायांवर लोटांगण घालून, ' चुकलों चुकलों' म्हणून म्हणूं लागला. दुर्वास आणखी म्हणाला; ' हे राजा ! तुला शाप दिल्यामुळे हे चक्र मागें लागलें आहे, त्याचें निवारण करण्यास तुझ्यावांचून कोणी समर्थ नाही, असे भगवंतानें सांगितले आहे, तर या चक्राचें निवारण कर." हे ऋषीचे शब्द ऐकून त्या राजानें ऋपीला उठवून योग्य आसनावर बसविलें, व त्याच्या चर णावर मस्तक ठेवून त्याची विधियुक्त पूजा केली व त्याच्या चरणाचें तीर्थ घेतलें; मग चक्राचें निवारण करण्यासाठी एकभुक्त सोमवाराचें व एका एकादशीचें पुण्य खर्ची घालून, त्या चक्राला हात जोडून राजा म्हणाला, हे चक्रा ! तूं सर्वव्यापक असून दुष्टांचा संहार व साधूंचा सांभाळ करण्याची शक्ति तुझ्या अंगी आहे. तुझ्या अंगीं सर्व शक्ति एकवटलेल्या असून तूं श्रीपतीचा अलंकार आहेस. हे चक्रा ! आतां या दुर्वासाला सोड; त्याच्या ह्या अपराधा- बद्दल दया कर. त्याच्या अपराधाबद्दल मी तुजजवळ क्षमा मागतों." याप्रमाणे चक्राची प्रार्थना केल्यावर प्रभूचें तें चक्र नाहीसे झाले. मग अंबरीष राजानें दुर्वासाला भोजनाला बसवून त्याचें जेवण झाल्यावर आपण जेवावयाला नंतर दुर्वासास विडा दक्षिणा वगैरे देऊन त्याचा राजानें योग्य · सत्कार केला. तो दुर्वास ऋषि त्या राजाचा निरोप घेतेवेळी म्हणाला, राजा तुझा मीं निष्कारण छळ केला याबद्दल मला क्षमा कर ऊंस पिळला 66 बसला.