पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] अन्याय ८ वा. १२१ ८८ ल्यावर दुर्वास ऋषि तेथून महादवोकडे गेला, पण महादेवांनीहि त्याची ब्रह्म- देवाप्रमाणेंच निराशा केली. महादेव ह्मणाले, हे दुर्वास ऋषे ! या चक्राच निवारण करण्यास मी अगदीं असमर्थ आहे. त्या वैकुंठपतीचा महिमा फार मोठा असून मी देखील महाविष्णूला आपले दैवत समजून त्याची पूजा करितों. तेव्हां तूं आतां परत विष्णूकडे जाऊन त्याचे पाय धर; त्यावांचून तुला आतां मुटका नाहीं." असें महादेवांनी सांगितल्यावर दुर्वासऋषी तेथून पळत पळत निघाला तो भक्तवत्सल प्रभूकडे आला. याप्रमाणे एक वर्षभर दुर्वासऋषि, त्या चक्राच्या भीतीनें उपवासी पळत फिरत होता, क्षुधेमुळे त्याची सर्व गात्रे शिथिल झालीं होतीं, हातांतला कमंडलू गळून पडला होता, आणि हातपाय लटलट कांपत होते. अशा स्थितीत लगबगीनें येऊन दुर्वासानें प्रभूच्या पायांला घट्ट मिटी घातली, व झालेल्या अपराधाबद्दल प्रभूची अनन्यभावानें क्षमा मागूं लागला. ऋषि ह्मणाला, “ हे देवा अनंता ! महादेवाचे मागे जसे ब्रह्मदेवाचं मुख लागलें होतें, त्याप्रमाणेच तुझें हें चक्र माझ्या मागे लागलें आहे, तर या संकटाचें आतां निवारण कर. या संकटातून सोडावयाला तुझ्यावांचून कोणीहि समर्थ नाही. " ३ कापालेश्वराची कथा. 66 जनमेजय राजाला वैशंपायन ऋषि अंबरीष राजाची कथा सांगत अस- तां जनमेजय राजा ह्मणाला; " वैशंपायन महाराज ! महादेवाचे मागें ब्रह्म- देवाचें मुख कसें लागले होते व त्याचें कारण काय ? तें ऐकावें अशी इच्छा आहे; तर ती कथा मला कृपा करून सांगावी." जनमेजय राजाची ही विनंति ऐकून वैशंपायन ऋषि ह्मणाला; राजा ! पूर्वी ब्रह्मदेवाला पांच मुर्खे असून तो चार मुखानें चार वेदांचें पटण करीत असे, व पांचव्या मुखाने उप जें गायन तें ह्मणत असे; परंतु वेदपठण करणारानें गायन करणें निषिद्ध असल्यामुळे शंकरानें ब्रह्मदेवाच्या पांचव्या मुखावर त्रिशूळ मारून ते मुख तोडून टाकलें, तेव्हां ब्रह्मदेवानें महादेवाला चंडीश पूजा वर्ज करण्याबद्दल शाप देऊन आपलें मुख महादेवाच्या मागे सोडलें, महादेवानें पुष्कळ प्रयत्न केला पण ते ब्रह्मदेवाचें मुख महादेवाचा पिच्छा सोडिना, तेव्हां महादेव, गुरू सिंह- राशीला आला आहे असे पाहून, अरुणा व गोदावरी यांच्या संगमावर आले. व गोदेच्या पलीकडे निघून गेले. निघून गेल्यावर त्यांच्या मार्गे मुखहि जाऊं लागले. पण त्याला गोदावरीच्या पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर तें गोदावरांच्या पाण्यांत जिरून गेलें. ही प्रचीति अद्यापिहि असल्यामुळे लोक, गुरु सिंहराशीला आल्यावर गोदावरीचे कांठीं जाऊन मृतांच्या अस्थि पाण्यांत टाकतात. महा- देवाची अशा रीतीनें सुटका झाल्यावर गोदावरीने त्यांची विनंति केली की,. आपण माझे सन्निध नेहमी रहावें, त्याप्रमाणे महादेव, अरुणा व गोदावरी यांचे