पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० [ स्तबक कथाकल्पतरु. २ सुदर्शनचक्र. गर्भवा- 36 दुर्वासऋषीचा तो शाप ऐकून अंबरीष राजाला फार वाईट वाटलें; साचीं दुःखें चुकावत हाणून तो राजा अहर्निश विष्णूची सेवा करीत असे, अशा त्या राजाला दहा गर्भवासांचा शाप ह्मणजे मोठाच दंड होय. त्या शाप- वाणीनें राजाचें हृदय भडभडून आलें, डोळे पाण्याने भरून आले आणि तो सद्ग- दित खरानें भगवंताचा धांवा करूं लागला. हे शारंगधरा ! हे करुणाकरा ! हे हृपी-- केशा ! केशवा ! श्रीपति ! या ऋषिशापापासून मला मुक्त कर. तुझ्या व्रताची योग्यप्रकारें सांगता करीत असतांना मला या ऋषीनें निष्कारण शाप दिला आहे. तर हे प्रभो ! नारायणा ! हे माझे दहा गर्भवास चुकीव याप्रमाणें अंबरीष राजानें भगवंताचा धांवा केल्यावर भगवान् - लक्ष्मीनारायण स्वतः अंबरीष राजापुढें प्रगट झाले. ती शंखचक्रगदापद्मधारी वैकुंठवासी श्रीपतीची सुंदर शामलमूर्ति पाहिल्यावर अंबरीष राजाच्या हृदयांत प्रेमाचे भरते आले व त्यानें प्रभूच्या चरण- णकमलाला कडकडून मिठी घातली. मग भगवंतानें राजाला आपल्या हातांनी धरून उठविलें, त्यावेळी राजाला भगवान् हाणाले, " हे भक्त शिरोमणी अंब- रोपा ! तुझ्या एकादशीव्रतामुळे मी तुझा ऋणी झाली आहे, तुला या ऋषींनी दिलेला शाप चुकणें नाहीं. पण तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न होऊन तें दहा गर्भ- वासांचें दुःख मी स्वत: सोशन, तूं त्याबद्दल मुळीच काळजी करूं नको. मी तुझे याच जन्मीं सर्व भवपाश तोडून टाकीन." याप्रमाणें भगवंतानें अंबरीषरा- जाला आश्वासन दिल्यावर दुर्वास ऋषीला अधिक कोप आला तो आपली जटा उपटून अंबरीष राजाचा नाश व्हावा ह्मणून त्याच्या अंगावर टाकू लागला. तेव्हां भगवंतांनी सुदर्शन चक्राचेठायीं अग्नीची योजना करून, तें चक्र दुर्वास ऋपीच्या जटेवर सोडलें. ती विलक्षण ज्वाला जटेवर आपटल्यामुळे दुर्वास ऋपी अत्यंत घाबरून गेला व त्या चक्राच्या भीतीनें पळूं लागला. परंतु चक्र त्याचा पिच्छा सोडीना. तो पुढे आणि चक मागें, असें एकसारखें चालले होते. वाटेंत त्या चक्राच्या आड वृक्षतृणादि जे कांहीं येई त्याचा तें चक्र जाळून नाश करीत असे. दुर्वास ऋषी क्षणमात्र कोठें विसांवा घेण्यासाठी उभा राहि- ल्यास तत्काल चक्राच्या ऊष्णतेमुळे जटा जळूं लागे, यामुळे ऋपीला पळता पळतां कोठें विसांवाहि घेतां येईना. याप्रमाणें तें चक्र चुकवावें ह्मणून दुर्वास ऋषि दरी खोऱ्यांतून, नदीनाल्यांतून, समुद्रांतून एकसारखा पळत होता, पण तें चक्र त्याचा पिच्छा मुळींच सोडीना. शेवटीं दुर्वास ऋषि ब्रह्मदेवाकडे गेला. व त्याला चक्राचें निवारण करण्याविषयी सांगू लागला. पण ब्रह्मदेव तसें करीना. तो ह्मणाला; “ हे ऋषि ! श्रीपति व उमापति यांची शक्ति, कांही विलक्षण आहे, मी केवळ त्यांचा दासानुदास असून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागतों. मी या चक्राचें निवारण करण्यास अगदी असमर्थ आहे. " ब्रह्मदेवानें असें सांगित-