पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय ८ वा. अध्याय ८ वा. 1000400000 ११९ अंबरीष राजाची कथा. बळीची कथा सांगितल्यावर वैशंपायन ऋषि जनमेजय राजाला, अंबरीष- राजाची कथा सांगू लागले. “अंबरीष राजा हा नाभागराजाचा पुत्र होता. तो अत्यंत सुशील व शांत स्वभावाचा होता. दानशूर, धर्मशील व विष्णुभक्त होता. तो पुष्कळ दिवसांपासून एकादशीचें व्रत करीत होता; प्रत्येक एकादशीचे दिवशी उपवास करून रात्री जागरण करून श्रीहरीचें कीर्तन करी; नंतर द्वादशीचे दिवशीं सूर्योदयाबरोबर स्नान वगैरे करून पांच घटका दिवस आल्यावर पारणें करीत असे. याप्रमाणें त्या राजाचा एकादशी व्रताचा पुष्कळ दिवस एकसारखा नियम चालला होता. एकदां एका द्वादशीचे दिवशीं राजानें स्नान करून श्रीहरीची पूजा केली व पारण्याची सर्व सिद्धता केली, वेळ झाल्यावर राजा दाराशीं येऊन कोणी अतिथी अभ्यागत आहे किंवा काय, हे पाहूं लागला. इतक्यांत दुर्वासऋषि दृष्टीस पडले. त्यांना राजानें आज द्वादशी आहे, भोजनाची तयारी झालेली आहे, तर पारणे सोडण्यासाठीं इकडेच यावें, ह्मणून विनंति केली; ती राजाची विनंति ऋषींनी मान्य केली; बरोबर असलेले सामान राजाकंडे ठेवून ते यमुना नदीवर स्नान करण्यासाठी गेले. तिकडे दुर्वासाचें यमुनेवर तर्पण, देवतार्चन यास बराच वेळ लागल्यामुळें इकडे राजाची द्वादशीची वेळ होऊन गेली. तेव्हां राजाला काय करावें हा मोठा विचार पडला; आमंत्रित केलेल्या अतिथीवांचून भोजन केल्यास तें अत्यंत अनुचित होय; बरें नैवेद्य समर्पण न करावा तर व्रतभंग होतो; राजा अशा विवंचनेत पडल्यावर त्याच्या पुरोहितानें राजाला शालिग्रामशिलेचें तीर्थ घेऊन पारणा करण्यास सांगिलें. मग राजानें त्याप्रमाणें शालिग्रामशिलेचें तीर्थ घेऊन व्रताची सांगता केली. राजानें पारणा करून कांहीं वेळ झाल्या- वर दुर्वासऋषि आपली स्नानसंध्या आटोपून आले. आल्यावर भोजनाची उत्तम. प्रकारची तयारी केलेली आहे, पात्रांत पंचपक्कान्ने वाढलेली आहेत, हें पाहून ऋपीला फार आनंद झाला; पण इतक्यांत दुर्वासऋषीच्या असे लक्षांत आले की, राजाने आपली वाट न पाहतां द्वादशी साधून घेतली; राजानें आपला मोठा अपमान केला असे दुर्वासऋषीला वाटलें व तो त्यामुळे संतप्त होऊन राजाला हाणाला, "राजा ! तूं माझी वाट न पाहतां पारणा केलीस हें तूं अत्यंत अनुचित के लेंस, मुक्तीच्या आशेनें तूं विष्णूची भक्ति करून हे व्रत करितोस पण या माझ्या अपमानामुळे तुला दद्दा घेळां गर्भवास भोगावे लागतील. "