पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ कथाकल्पतरु. [ स्तबक ५ बळीचा पाताळलोकीं वास. राजा जनमेजया ! बळी राजाचीहि त्या गजेंद्राप्रमाणेच अवस्था झाली होती, बळीला गजेंद्राप्रमाणेंच शुक्राचार्याचा शाप होता. बळीची ती तशी अवस्था झाल्यावर त्यानें प्रल्हादाचा धांवा केला, तेव्हां त्याचा आजा प्रल्हाद ब्रह्म- "हे देवाला बरोबर घेऊन आला. मग ब्रह्मदेवानें विष्णूची विनंति केली कीं, अनंता ! हा बळी तुझा परमभक्त असून त्यानें आपले वचन पुरें केलें आहे; आतां झाली इतकी शिक्षा पुरे झाली, तर याच्यावर दया करून ही बळीची बंधनें काढून टाक. " मग नारायणास दया आली व त्यांनी बळीची बंधनें काढून टाकली. नंतर भगवान् ह्मणाला, मला निष्कांचन भक्त विशेष आवडतात. राज्यसंपत्तीच्या मदानें उन्मत्त झालेल्यांना माझ्या पदाची के- व्हांहि प्राप्ति होणार नाही. यासाठी बळीला मला निष्कांचन करावें लागलें. ज्याला संतति संपत्ति पाहिजे असेल त्यानें शंकराची सेवा करावी; मी तें देण्याला समर्थ नाहीं. आमच्याजवळ फक्त मुक्ति आहे, ती मी माझ्या भक्तांना देतो. बळी हा माझा खरा भक्त आहे, त्याच्या सारखा दानशील कोणीहि नाहीं, प्रत्यक्ष मी ज्याच्यापुढे हात पसरला, त्या या बळीच्या उदारतेची कीर्ति जगांत अक्षय्य कायम राहील. त्याला मी पाताळचें राज्य देतों; त्याचा त्यानें आनंदाने उपभोग घ्यावा. असे सांगून भगवंतानें बळीला पाताळांत राज्यावर नेऊन बसविलें." तेव्हां बळी झणाला, " प्रभो ! आपण मला पृथ्वीवरून पाताळांत आणलं पण माझी आठवण पृथ्वीवरील लोकांना राहील अशी कांहींच तजवीज केली नाहीं." हें ऐकून भगवान् ह्मणाला, तुझी आठवण पृथ्वीवरील लोकांना अक्षय्य राहील. प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीं लोक तुझी प्रतिमा करून तिचें पूजन करितील, व तो दिवस मोठ्या आनंदानें घालवितील." याप्रमाणे बळीला सांगून भगवान् क्षीरसागरीं निघून गेले. बळी पाताळांत राज्य करीत असतां कांहीं दिवसांनी त्यास पुन्हां इंद्राची अमरावती घेण्याची इच्छा झाली; तेव्हां तत्काळ विष्णूचे वरुणपाश येऊन त्यानें बळी बद्ध झाला. ती बळीची अवस्था पाहून प्रल्हाद मोठया विवंचनेत पडला; त्यास काय करावें तें कळेना, इतक्यांत तेथें नारद आला, व त्यानें प्रल्हादाला श्रीहरीची करुणा भाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रल्हादानें विष्णूची प्रार्थना केल्यावर भगवान् प्रगट झाले व त्यानें बळीचीं बंधनें दूर केली. मग बळीनें प्रभूची अनन्यभावानें क्षमा मागितली, व भगवंतानें सदोदित आपल्या सन्निध रहावें अशी विनंति केली; भक्तवत्सल प्रभूनें बळीची ती विनंति मान्य केली व तेव्हांपासून तो बळीचे द्वारी पाताळी राहिला. तेथून दुर्वासानें त्याला चक्रतीर्थाचे वेळीं कुश दैत्याचा संहार करण्यासाठी आणलें होतें."