पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] व्हावें हैं तुझ्या ब्रीदाला शोभत नाहीं. मग माझ्या पतीवर अशी अवकृपा कां ?" अध्याय ७ वा. ११७ इंद्रद्युम्नासारख्यांचा तूं उद्धार केलास, 4 , "7 बैशंपायन ऋषि याप्रमाणे बळीची कथा सांगत असतां जनमेजय ह्मणाला, "ऋषी ! इंद्रद्युम्नाचा भगवंतानें कसा उद्धार केला तें ऐकण्याची माझी इच्छा आहे तर ती कथा मला सांगावी." तेव्हां वैशंपायन ऋषि हाणाला, "राजा ! पूर्वी- इंद्रद्युम्न या नांवाचा एक राजा द्रविड देशांत राज्य करीत होता; त्या राजाचें आचरण अत्यंत पवित्र असून तो मोठा विष्णुभक्त होता; तो फार दयाळू असून नेहमीं दानधर्म करीत असे, व आपला सर्व वेळ श्रीहरीच्या भजनपूजनांत घालवीत असे. एके दिवशीं तो राजा पुण्यनदीचे कांठीं श्रीहरीची पूजा करून ध्यानस्थ बसला होता, त्यावेळी तेथें अगस्तीऋषि आले; परंतु राजा ध्यानस्थ असल्यामुळे त्यानें ऋषीकडे मुळींच लक्ष दिले नाहीं; त्यामुळे ऋषीला राग आला व तो त्या राजाला ह्मणाला, तूं विष्णुभक्तीमुळे फार उन्मत्त झाला आहेस; ऋषीचा आदरसत्कार तुझ्याकडून झाला नाहीं; या तुझ्या दांडगेपणा- बद्दल तूं हत्ती होऊन रानांत फिरशील." हा ऋषीचा शाप ऐकून राजाला फार वाईट वाटलें, तो ऋषीच्या चरणावर मस्तक ठेवून ह्मणाला, "ऋषि ! मी ध्या- नस्थ असल्यामुळें मजकडून हा प्रमाद झाला, तरी अपराधाची क्षमा करावी. तेव्हां अगस्ती ऋषि हाणाले की, "माझा शाप भोगल्यावांचून तुला आतां सुटका नाहीं; पण कांहीं दिवसांनी तुझ्या शरीराला विष्णूचा हस्तस्पर्श होऊन तुझा उद्धार होईल." पुढें तो राजा हत्ती होऊन वनांत हिंडूं लागला, एके दिवशी तो पाणी पिण्यासाठी एका सरोवरांत गेला; तो त्या हत्तीचा एक पाय सरो- वरांतील मगरानें घट्ट धरला. पाय सोडवून घेण्यासाठी हत्तीनें आपली सर्व शक्ति खर्च केली, पण तिचा कांहीएक उपयोग न होतां तो अधिकाधिक खोल पाण्यांत मात्र जाऊं लागला. तेव्हां हत्तीला परमेश्वराचें स्मरण झालें तो देवाची करुणा भाकूं लागला. हे दीनोद्धारका वैकुंठपति ! हे अभयंकरा ! हे अनाथनाथा ! गरुडध्वजा ! हे शंखचक्रपद्मगदाधारी नारायणा ! हा तुझा दीन भक्त मगराच्या मुखीं सांपडला आहे, तर यावेळी धांवून ये, व या तुझ्या भक्ताचें संरक्षण कर." ती त्या हत्तीची दीनवाणी ऐकून भगवंतास दया आली, व तो भक्तवत्सल प्रभु गरुडावर बसून अत्यंत वेगानें गजेंद्राजवळ आला. प्रभूची ती शंखचक्रगदापद्मधारी चतुर्भुज सुंदर शामलमूर्ति पाहून त्या पशुचे डोळे प्रेमा- श्रृंनी भरून आले; मग भगवंतानें गजेंद्रास ओढून सरोवरांतून बाहेर काढलें, तेव्हां तो गजेंद्र प्रभूच्या हस्तस्पर्शामुळे पुन्हां पूर्ववत् इंद्रद्यम्न झाला. तसाच तो मगरहि गंधर्व झाला; तोहि असाच शापामुळे मगर झाला होता. त्या भक्त- वत्सल प्रभूनें दोघांची शापापासून मुक्ति केली व त्या दोघांना विमानांत बसवून वैकुंठास नेलं. " 66