पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक C चार भाग केले. चार भाग केल्यावर त्यानें स्त्रियांना बोलाविलें. त्यांना एक भाग घेण्याविषयी सांगितले. तेव्हां स्त्रिया ह्मणाल्या; "इंद्रा! आह्मी हा पातकाचा भाग घेतों, पण त्या पातकाच्या सोडवणुकीचा मार्गहि आह्मांला सांगून ठेव. तसेच अष्टौप्रहर आमच्या आंगी रतिधर्म उत्पन्न करून आह्मांला अष्टगुण दे." हे ऐकून इंद्र ह्मणाला, "हे गुण तुझांला मन्मथामुळे प्राप्त होतील. परंतु याच तुमच्या रजस्वलाधर्मापासून तुझाला संतति होईल, व त्या संततीच्या पिंड- दानामुळे तुमच्या पातकाचा नाश होईल; तसेंच तुह्मीं पतीवर भक्ति ठेवून त्यांची सेवा करावी, व तो निवर्तल्यावर ब्रह्मचर्यव्रतानें रहावें ह्मणजे तुमची सर्व पातकांपासून सोडवणूक होईल " याप्रमाणें ब्रह्महत्येच्या पातकाचा स्त्रियांना एक भाग दिल्यावर, इंद्रानें सर्व नद्यांना बोलाविलें व त्यांना एक भाग दिला; तेव्हां नद्या ह्मणाल्या, " इंद्रा ! आह्मी हा पातकाचा भाग घेतों, पण आमचा प्रवाह जो चारच महिने असतो तो बाराहि महिने वहावा. " हे ऐकून इंद्र झणाला, "समुद्राजवळ तुमचा प्रवाह बाराहि महिने राहील. तुझीं हें ब्रह्म- हत्येचें पातक घेतल्यामुळे लोक तुझांला वर्षाकाळी अपवित्र मानितील, परंतु समुद्रास मिळाल्यावर तेथें तुझीं पवित्र व्हाल. यानंतर इंद्रानें अग्नीला बोला- चिले व त्याला पातकाचा एक भाग दिला. तेव्हां अग्नि हाणाला, “इंद्रा ! यामुळे मला अपवित्रता येईल; आज माझ्या मुखांतल्या आहुति सर्व देव घेतात, पण या अपवित्रपणामुळे माझ्या मुखांतल्या आहुति कोणी घेणार नाहीं असें वाटतें; तर हा दोष कोणी न मानतां मला पवित्र मानावें असें मला वरदान दे. " इंद्राने त्याला त्याप्रमाणे वरदान दिलें; पण त्या पातकाची खूण अग्नीला अद्यापि राहिली आहे. अग्निसिद्धि करतेवेळेस, काळा धूर निघतो तो ब्रह्महत्येचा निदर्शक आहे. यानंतर इंद्राने चवथा भाग पिंपळावांचून इतर सर्व वृक्षांना दिला. तेव्हां वृक्ष ह्मणाले, "इंद्रा ! सर्व लोक आमचें छेदन करितात तर त्याचा कांहीं तरी बंदोबस्त करावा." मग इंद्र ह्मणाला, तुमच्या शाखा तोडल्यास तुझांस नवे अंकुर फुटतील, तुमची फळें लोक आवडीनें खातील, व तुमच्या छायेला वाटसरू बसून आपल्या श्रमाचा परिहार करितील. याप्रमाणे इंद्रानें तें ब्रह्महत्येचें पातक चवघांना वांटून देऊन आपण मोकळा झाला. " ४ इंद्रद्युम्न राजाची कथा. या दधीचि ऋषीप्रमाणेच बळी हा सत्यवादी असल्यामुळे त्यानें दान- अतासाठी मस्तक प्रभूच्या पायाखाली देऊन राक्षसांना प्रतिबंध न करण्या- विषयीं सुचविलें. मग भगवंतांनीं वरुणपाशांनी बळीला पक्के बांधून टार्किले जेव्हां बळीची स्त्री विंध्यावळी भगवंताला हात जोडून ह्मणाली, " हे अनंता ! विश्वपालका ! तुझे भक्त तुझी पूजा करीत असतां त्यांना असे बंधन प्रास