पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२.] अध्याय ७ वा. २११५ देवांचे मार्गे न लागतां तेथून दुसरीकडे निघून गेले. इकडे दधीचि ऋषीने ती सर्व शस्त्रे एका ठिकाणी करून त्याचें चूर्ण केले व तें कमंडलूत घालून त्यांत पाणी घातले आणि तें पाणी प्राशन केलें. वृत्रासुरानें अमरावती घेतल्यावर पुढे काय करावयाचें असा सर्व देवांना विचार पडला; मग इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला व त्यानें ब्रह्मदेवाला संकटाचें निवारण कशानें होईल तें विचारलें. ब्रह्मदेवानें सर्व देवांना दहा सहस्र वर्षे तप करण्यास सांगितले. त्याप्रमाणें तप केल्यावर देव पुन्हां ब्रह्मदेवाकडे गेले, तेव्हां ब्रह्मदेवानें त्यांना असें सांगितलें कीं, तुझीं दधीचि ऋषीकडे जाऊन आपली पूर्वीची शस्त्रास्त्रे मागा; झणजे तो ऋषि आपल्या अस्थि तुझाला देईल. त्या अस्थींचें शस्त्र तयार करा, झणजे त्या शस्त्रानें वृत्रासुराचा नाश होईल." ब्रह्मदेवानें असें सांगितल्यावर इंद्रादि देव दधीचि ऋषीकडे आले व आपआपली शस्त्रास्त्रे मागू लागले. तेव्हां दधीचि ह्मणाला, " मीं तीं शस्त्रे पीठ करून खाऊन टाकली आहेत, तेव्हां तीं देणें आतां अशक्य आहे, पण शस्त्रे न दिल्यास मी तुमचा ऋणी होईन आणि ऋण असणे हे मोठे पाप आहे, तर माझा नाश करून माझ्या तुझीं अस्थि घ्या, आणि त्यांची शस्त्रे तयार करा, ह्मणजे मी तुमच्या ऋणांतून मुक्त होऊन त्या वृत्रासुराचाहि नाश होईल. ” ऋषीनें असें सांगितल्यावर इंद्रानें कामधेनु आणली व तिचेकडून ऋषीच्या शरीराचा नाश करवून अस्थि, मांस व चर्म हीं निरनिराळीं करविलीं; त्या अस्थींचें बावीस अंगुले वज्र झालें. पुढे वृत्रासुराचें व इंद्राचें युद्ध झालें, त्यांत इंद्रानें त्या शस्त्रानें वृत्रासुराचा नाश केला. १ ३ ब्रह्महत्येचें पातक या दधीचि ऋषीचें पूर्वीही एकदां इंद्रानें मस्तक कापलें होतें; पण अश्वि- नीकुमारानें त्यावेळीं दधीचि ऋषीचें संरक्षण केलें होतें. दधीचि ऋषीला येत असलेला महामंत्र शिकावा हाणून अश्विनीकुमार दधीचीजवळ येऊन राहिला होता; तो मंत्र अश्विनीकुमाराला प्राप्त होऊं नये, अशी इंद्राची इच्छा असल्यामुळे इंद्रानें एकदां संधी साधून दधीचि ऋषीचें मस्तक कापून ते पळविलें; तेव्हां अश्विनीकुमारानें एका घोड्याचे मस्तक आणून तें ऋषीच्या धडावर ठेविलें व ऋषीला जिवंत केलें. तो राग दधीचि ऋषीचे मनांत नव्हता; पण दधीचा पुत्र सुमछु याचे मनांत होता, त्यांत आणखी इंद्रानें कामधेनूकडून आपल्या बापाचा नाश करविल्याचें त्याला कळल्यावर तर तो अत्यंत क्रुद्ध झाला व त्यानें कामधेनूला शाप दिला कीं, " म्लेंछ लोक तुला असेंच कापून तुझें मांस भक्षण करितील, व तुझें मुख अपवित्र होईल. " काम: घेनूला असा शाप मिळाल्यावर इंद्रालाहि भीति पडली व त्यानें त्या ब्रह्म- हल्लेबद्दल प्रायश्चित्त घेतलें; परंतु पापाचा वांटा स्वतः ग्रहण न करितां त्याचे