पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु [ स्तबक V भूमि मीं ब्यापिली, तेव्हां तिसरा चरण कोठें ठेवूं तें सांग." भगवंताचें हें बोलणें ऐकून बळीला मोठा विचार पडला की, आतां तिसऱ्या चरणाला भूमि कोठून " देवा ! द्यावी, शेवटी कोठेंहि भूमि नाहीं असे पाहून बळी देवाला ह्मणाला; माझी स्वतःची अशी सर्व भूमि तुझ्या दोन पावलांतच गेली; आतां माझें स्वतःचें असें मजजवळ फक्त शरीर आहे; तर तिसरा चरण माझ्या मस्तकावर ठेऊन मला ब्रह्मऋणांतून मुक्त करावें. " असें ह्मणून बळीनें स्नान केलें व मस्त- कावर विष्णुस्वरूप असे तुलसीपत्र ठेवून विराट पुरुष भगवंताचे चरणावर मस्तक ठेविलें. त्यावेळी त्याच्याजवळ विंध्यावळी व जलपद्मिणी अशा त्याच्या दोन्ही स्त्रियाहि होत्या; त्यांनींहि भगवंताचें दर्शन घेतले. मन वामनाने आपला पाय बळीच्या मस्तकावर ठेवला. अनंत वर्षे तप करणाऱ्या तापसांना- देखील ज्या प्रभूच्या चरणाचा स्पर्श होत नाहीं, ते प्रभूचे चरण बळीच्या मस्त- काला लागल्यावर बळीला स्वत:विषयी मोठी धन्यता वाहूं लागली. त्या विराट पुरुषाचे भयंकर चरण बळीला फुलाप्रमाणें वारूं लागले. १ २ दधीचि ऋषि व देवांची शस्त्रे. ११४ बळीला भगवान् आपल्या पायानें भूमीत दडपीत आहे, असें पाहून बळीच्या सैन्याला अनावर कोप आला व ते इंद्रावर धांवून आले, पण बळीने त्यांना तसें करण्याविषयीं निषेध केला. बळी आपल्या सैन्याला हाणाला; " सैनिक हो !. असें करण्याचें आतां कांहीं प्रयोजन नाहीं; मी वचनबद्ध झालों आहे तेव्हां मला माझा शब्द पुरा केला पाहिजे. दधीचि ऋषीनें देवांच्या शस्त्रासाठी आपल्या शरीरांतल्या अस्थि दिल्या, पण शब्द मार्गे घेतला नाही, त्याप्रमाणे मीहि आपल्या दानवतापासून कवी ढळावयाचा नाहीं; तर यासाठी तुझी. आतां कोणासहि प्रतिबंध न करितां जें होत आहे त्याबद्दल समाधानच माना. "7 66 देवांनां दधीचि ऋषीने आपल्या अस्थि दिल्या हें ऐकून, जनमेजय राजाला ती कथा ऐकण्याची इच्छा झाली; तेव्हां वैशंपायन ऋषि राजाला ती कथा सांगू लागला. तो हाणाला; राजा ! पूर्वी वृत्रासुर या नांवाचा एक महान् पराक्रमी असुर होता, त्यानें महादेवाची सेवा करून त्याला प्रसन्न करून घेतले व मी सर्व मुरवरांना जिंकावें असा त्यानें त्यांच्याकडून वर मिळविला. पुढे त्या राक्षसानें इंद्रलोकावर स्वारी करून सर्व देवांना जिंकलें. तेव्हां देव भयाकुल होऊन अमरावती सोडून पळू लागले, परंतु राक्षस देवांचा पिच्छा सोडनात, पुढें देव पळत आहेत आणि मार्गे राक्षस लागले आहेत; अशाप्रकारें पळत पळत देव चालले असतां देवांनी असा विचार केला कीं, आपण हातांतली त्यावांचून राक्षस आपला पिच्छा सोडणार नाहींत. मग देवांनी दधीचि ऋषीच्या आश्रमांत येऊन ऋषीजवळ आपआपली शस्त्रास्त्रे दिली व ते तेथून निघून गेले. देव निःशस्त्र आहेत असे पाहून राक्षस खाली टाकळी पाहिजेत,