पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] अध्याय ७ वाः ११३ कांठी खेळत असतां त्यांची नजर त्या सरड्याकडे गेली, मग त्या मुलांनी सरड्याच्या कमरेला दोरी बांधली व त्याला वर ओढूं लागले; पण तो सरदा मुळी एक बोटभर देखील हालेना. हा चमत्कार पाहून मुलांना फार आश्र वाटलें, व त्यांनीं तो प्रकार श्रीकृष्णाला सांगितला; तेव्हां श्रीकृष्ण त्या विहिरी- जवळ आला व त्यानें आंत पाहिलें तों तो सरडा नसून नृगराजा शापामुळे सरडा होऊन पडला आहे असें त्याच्या लक्षांत आलें. मग श्रीकृष्णानें त्याला बाहेर काढून त्याचा उद्धार केला. " 66 बळी, शुक्राचार्याला ह्मणाला; गुरू ! मीं वामनाला तीन पावलें भूमि देता ह्मणून वचन दिलें आहे, तेव्हां आतां मला आपला शब्द कधीहि परत घेत येणार नाहीं. वचनभंग करणाऱ्या पुरुषाचे दहा पुरुष मागील व दहा पुरुष पुढील नरकांत जातात, तेव्हां त्या पातकाचा मी कधींहि अधिकारी होणार नाही. " बळी आपले ऐकत नाही, असे पाहून शुक्राचार्याला फार राग आला व त्यानें बळीला तूं श्रीहीन होशील असा शाप दिला. अध्याय ७ वा. १ तीन पावलें भूमि. शुक्राचार्य इतका क्रुद्ध होऊन त्यानें बळीला शाप दिला, तरी बळीनें आपला निश्चय ढळविला नाहीं; त्यानें वामनास आसनावर बसवून आपण आपल्या दोन्ही स्त्रियांसह त्याच्या समोर बसला व वामनाची त्यानें विधियुक्त पोडशोपचारें यथासांग पूजा केली; वस्त्रे वगैरे देऊन त्याचें तीर्थ मस्तकावर घेऊन वंदन केले आणि नंतर तीन पावले भूमीचा संकल्प केला. वामनाचे हातावर संकल्पाचें उदक पडल्याबरोबर त्यानें आपला बटु वेष टाकून दिला व विराट आदिपुरूषाचें रूप धारण केले. त्या विराट पुरुषाचें वर्णन करणेंहि कठिण होय. पाय पाताळांत असून मस्तक एकवीस स्वर्गमंडळें व्यापून वर गेले होतें. वक्षस्थळावर सूर्य चमकत होता, कंठप्रदेशीं तारका माळेप्रमाणें शोभत होत्या, त्याच्या बाहूंनी सर्व दिग्मंडळें व्यापली गेली होती, असें तें विराट स्वरूप पाहून सर्व भयभीत झाले. परंतु बळीला तें रूप पाहून मोठा हर्ष झाला; प्रभूनें आपणास आज दर्शन दिलें याबद्दल त्याला फार धन्यता बाटली, प्रभूच्या आजच्या कृपेमुळे माझ्या मागच्या व पुढच्या कित्येक पिढ्यांचा उद्धार होईल असा त्याला भरं- वसा उत्पन्न झाला. नंतर विष्णूने आपल्या एका विराट चरणानें संपूर्ण भूमंडळ ब्याप्त केलें, दुसरा चरण स्वर्गात ठेवला, तेव्हां तिसरा चरण ठेवण्यास जागा नाहीं असे पाहून भगवान् बळीला झणाला; "बळी ! दोन चरणानेंच तुझी सर्व