पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२] अध्याय ६ वा. राजा असून तूं शंभर याग करीत आहेस असें ऐकून या ब्राह्मणांबरोबर तुझ्याकडे आलो आहे." वामनाचें तें भाषण ऐकून बळीला अत्यंत संतोष झाला. बळी राजा वामनाला ह्मणाला, “वामना ! तूं माझ्या या यागसमयीं याचनेसाठी आलास याबद्दल मला फार आनंद वाटतो; तुझी जी इच्छा असेल ती मला सांग. मी ते देण्यास तयार आहे." याप्रमाणे बळीला प्रसन्न केल्यावर वामन ह्मणाला, "बळी ! मला तीन पावलें जागा द्याल तर फार उपकार होतील. त्या जागेवर आश्रम बांधून स्नानसंध्या करीत राहीन. तर कृपा करून तेवढी तीन पावलें भूमि द्यावी. हें वामनाचें मागणे ऐकून बळीला हसू आलें, व तो ह्मणाला, "बटो! हे आपण अगदीच थोडें मागितले. कांहीं देश, दुर्ग, रत्नें, सोनें वगैरे मागावें अशी माझी इच्छा आहे. आपणासारख्या विद्वान् ब्राह्मणाला अवधी तीन पावलें भूमि देणें यांत माझी दानशीलता मुळींच दिसून येणार नाहीं. तर कांहीं अन्य माझ्या कीर्तीला शोभेल असे माग . " वामन ह्मणाला, "बळी! आह्मां ब्राह्मणांनां देश . आणि पैसा घेऊन काय करावयाचे आहे ? ही संपत्ति बोलून चालून चंचल आहे, ती कोणाजवळ एकसारखी रहात नाही आणि असते तेव्हां मनुष्यास सन्मार्गापासून भ्रष्ट करते; तेव्हां ती लक्ष्मी घेऊन आह्मांस काय करावयाचें आहे ? वेणु, पृथु, पुरूरवा, रुक्मांगद यांच्यासारख्या मोठमोठ्या राजांनी देखील राज्यलक्ष्मी सोडून देऊन ईश्वरसेवेंत काळ घालविला आहे, मग आह्मांसारख्या ब्राह्मणांना ही राज्यलक्ष्मी घेऊन काय करावयाचे आहे ? मला एक तीन पावलें भुमि दे, झणजे तेवढ्यानें माझा कार्यभाग होऊन मला संतोप होईल.” बळी राजाजवळ वामन याप्रमाणें तीन पावले भूमीची याचना करीत अस तां शुक्राचार्याने सर्व प्रकार अंतर दृष्टीनें जाणला, मग तो राजाला एका बाजुला बोलावून ह्मणाला, “राजा ! हा वटू कपटवेषधारी विष्णु आहे, वामन अवतार धारण करून तो तुझा नाश करण्यासाठी आला आहे; तर तो मागतो त्याप्रमाणे त्याला तीन पावलें भूमि देऊं नकोस. अरे ! या विष्णूनें वराह अवतार घेऊन हिराण्याक्षाचा व नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकशिपूचा नाश केला आहे, आणि आतां वामन अवतार धारण करून तुझा नाश करण्यासाठी आला आहे." आपलें भाषण ऐकून बळी राजा त्याप्रमाणे वागेल असा शुक्राचार्याला भरंवसा होता; पण शुक्राचार्याचें तें भाषण ऐकून बळीला मोठा आनंद होऊन तो ह्मणाला; "गुरु ! जर प्रत्यक्ष भगवान् माझा नाश करण्यासाठी आले असतील तर मी खरोखरच मोठा भाग्यवान् आहे असें हाटले पाहिजे. अहो मोठमोठे तापसी ज्याच्यासाठी हजारों वर्षे तपश्चर्या करितात, तरी ज्याचें नखहि त्यांच्या दृष्टीस पडत नाहीं, तो जगजेठी प्रत्यक्ष आला आहे, याहून आणखी काय. पाहिजे ? तो जे इच्छील, तें मी त्याला देईन, असें मी त्याला वचन दिले आहे. त्या वचनापासून मी कधींहि ढळावयाचा नाहीं. एकवेळ समुद्र मर्यादा