पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.कथाकल्पतरु. [ स्वयंक कश्यपाने मेखला, उमासावित्रींनी भिक्षेचे वेळी लाडू, पृथ्वीनें आसन, ऋषींनी तृणासन, चंद्रानें दंड, कुबेरानें पात्र, इंद्रानें छत्र आणि बृहस्पतीने यज्ञो-- पवीत दिले. याप्रमाणे मौंजीबंधन समारंभ झाला, व देव आपापले स्थानी गेले. आणि ऋषीजन बळीच्या शंभराव्या यागाची समाप्ति असल्यामुळे तिकडे जाण्यास निघाले. बरोबर कश्यपहि होता; सर्व ऋषि निघाल्यावर, मलाहि बरोबर घेऊन चला अर्से वामन ह्मणाला. तेव्हां कश्यपार्ने वामनासहि बरोबर घेतलें. बळीच्या यज्ञमंडपांत सर्व ऋपीजन आल्यावर बळीने सर्वांचा सत्कार करून सर्वांना बसण्यासाठी आसने दिली. सर्व ऋपी राजाला पाहिल्याबरोबर मंत्र- घोष करूं लागले; त्यांत वामनाचें मनोहर मंत्रोच्चारण पाहून बळी अगदी मुग्ध होऊन गेला. तो आपले गुरू शुक्राचार्यांना कौतुकानें ह्मणाला, चार्य ! आजपर्यंत आपणाकडे पुष्कळ ब्राह्मण आले, परंतु यासारखा विद्वान् मीं पाहिला नाहीं. तिन्ही सवनांचा शांतिपाठ हा फारच चांगल्या रीतीनें ह्मणाला. हा सकल वेद वगैरे विद्येत पारंगत असून वयानें किती लहान आहे ! याचे नुकतेंच मौंजीबंधन झाले असून याचें वय अवधें सात वर्षीचें आहे. असा ब्राह्मणाचा विद्वान् मुलगा शंभराव्या याग समाप्तीचे वेळी आला हैं आपलें महत्- भाग्य ह्मणावयाचें ! याप्रमाणे बळीनें शुक्राचार्याजवळ वामनाची स्तुति करून त्यास आपणाजवळ बोलावून घेतले व त्याला शंभर यागांविषयी राजा सांगू लागला. तेव्हां वामन बळीला ह्मणाला, "राजा ! हे शंभर यज्ञ तूं केलेस खरे, पण ज्या पद्धतीने करावयाला पाहिजे होते तसे मुळींच झाले नाहीत; तुझ्याजवळ कोणी विद्वान् ब्राह्मण नसल्यामुळे अशी चूक झाली असे मला वाटतें. या तुझ्या शुक्रा- चार्य गुरूनें तिन्हीं अग्नींची स्थापना उलटी केली आहे. हे अत्यंत अनुचित असून त्याचें फळ राजाला पीडादायक असे आहे. तसेच ग्रहांची पूजाहि उल- टीच झालेली आहे, त्यामुळे मंत्र भ्रष्टतेचा दोष राजाला लागला आहे. अशा अनेक कारणांनी हे याग योग्य असे झाले नाहींत." याप्रमाणे बळीला वामनानें शुक्राचार्य जवळ असतांना अनेक श्रुति वगैरेवरून स्पष्ट करून दाखविले. बामनाची ती विद्वत्ता पाहून बळीला फार आश्चर्य वाटले. मग तो वामनाला झणाला, "हे बटू ! आपण कोठें राहतां, आपले आईबाप कोण, आपण हा एवढा सकल शास्त्रांचा अभ्यास इतक्या लहानपणी कोठें केला, तें मला कृपा करून सांगावे." हा बळीचा प्रश्न ऐकून वामनाला हंसूं आलें. वामन ह्मणाला, "बळी ! माझा वास कोणत्याहि एका स्थळी असा नाहीं; यामुळे मी अमुक ठिकाणचा राहणारा आहे असे मला सांगतां येत नाहीं. तसेंच आईबाप कोण तेंहि मला कांहीं आठवत नाहीं, मग त्यांची नांवें तरी मला कोठलीं माहित ? विद्याभ्यास असाच स्वतः ऐकून ऐकून केला जात कोण, कुळ कोण, तेंहि मला माहित नाहीं. मी आपला असा भडकणारा परदेशी असून एकटा आहे. तूं महादानशील " शुक्रा-