पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२.] अध्याय ६ वा. ज्याने माझ्या पित्याचा प्राण घेतला त्याला मी जिंकावें, व त्रिभुवनाएवढे मोठे शस्त्र जो हातांत धारण करील त्या वांचून सर्व माझे अंकित व्हावेत असा मला वर दे." महादेव त्यावेळी प्रसन्न असल्यामुळे तथास्तु म्हणाले. अशा • रीतीनें गदासुरानें महादेवाचा वर मिळविल्यावर त्याला आपण अजिंक्य झाल् असे वाटलें, व तो विष्णूचा सूड उगविण्यासाठी त्यांचा शोध करूं लागला. तेव्हां गयेस, गदासुर व विष्णू यांची गांठ पडली, भगवंतास पाहतांच गदा मुराचा कोप अनावर झाला व तो विष्णूला आपल्या हातांतील त्रिशूळाने प्रहार करूं लागला. त्या आघातामुळे पृथ्वी तळमळू लागलो. सर्व लोक भय- भीत झाले, परंतु भगवंतास त्याबद्दल कांहींच वाईट वाटले नाहीं. पर्वतावर फुले पडावीत त्याप्रमाणे त्याने ते त्रिशूळाचे घाव लीलेनें सहन केले. गदासुराचें ताडण सहन करून मग प्रभूनें सुदर्शन चक्र काढले व तें गदामुराचे आंगावर टाकण्याची तयारी केली; तों आकाशवाणी झाली कीं, " हे अनंता! या गदा- "सुरावर चक्र सोडूं नकोस, त्याचा उपयोग होणार नाहीं; याच्या घाताला त्रि- भुवना एवढें शस्त्र पाहिजे." ती आकाशवाणी ऐकून भगवंतांनीं सुदर्शनचक्र परत घेतलें, व आपला प्रवेश गदेंत करून ती त्रिभुवनाएवढी मोठी केली, आणि त्या गदेनें गदासुराचा नाश केला. तेव्हांपासून त्या भक्तवत्सल प्रभूला गदाधर असेंहि ह्मणतात. " 66 १ ३ वामनभिक्षा. १ प्रभूनें ज्या वेळी अदितीला मी तुझ्या उदरीं जन्म घेऊन बळीचा नाश करीन असे अभिवचन दिले होते, त्याच वेळी भगवंतांनी अदितीच्या उदरीं प्रवेश केला. तेथें गर्भावस्थेत विष्णु बळीच्या यागाची समाप्ति होईपर्यंत ह्मणजै सहस्र वर्ष होते. नंतर भाद्रपद शुद्ध द्वादशीचे दिवशीं प्रभूंनी जन्म घेतला. त्या मंगलमय प्रसंगी स्वर्गात देवांनी जयजयकार करून प्रभूच्या बालमूर्तीवर पुष्पवृष्टि केली. दुंदुभी वाजूं लागल्या. स्वर्गोगना नृत्य करूं लागल्या. उमा- · सावित्रींनी आरती ओवाळली, व ब्राह्मणांनीं वेदघोष केला. याप्रमाणे सर्वत्र आनंदीआनंद होऊन गेला. कश्यप अदितीकडे लहान मुलास पहावयास आला, तो प्रभूंनी त्याची भ्रांति नाहींशी व्हावी ह्मणून शंख, चक्र, गदा, पद्म- घारी अशी चतुर्भुज मूर्ति त्यास दाखविली, व प्रभु पुन्हा बालरूप झाले. आपल्या पोटी प्रत्यक्ष प्रभूंनी जन्म घेतला, याबद्दल कश्यप व अदिती यांना जो आनंद झाला त्याचे वर्णन करणे कठीण होय. कश्यपानें त्याचे नाव वामन असे ठेविलें. प्रभु स्वयंज्योति, स्वयंप्रकाश, स्वत:श्री व ज्ञानी होते. त्यांना शिकविण्याची वगैरे आवश्यकता नव्हती, त्यांच्या सर्व विद्या, वेद वगैरे नेहमींच पूर्ण आहेत. प्रभूला सातवें वर्ष लागल्यावर कश्यपानें अनेक ऋषींना बोला- चून वामनाचे मौंजीबंधन केले. त्या वेळी ब्रह्मदेवानें वामनाला कमंडल,