पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक भूमि तयार केली, व देशोदेशींचे विद्वान्, सत्पात्र व पवित्र ब्राह्मण बोलावून सुमुहूर्तावर बळी राजाचे हाताने शंभर यागांनां आरंभ केला. त्या यागांची समाप्ति सहस्र वर्षांनी होणार होती. इकडे इंद्र, कश्यप व अदिती क्षीरसागरी येऊन भगवंताच्या दर्शनासाठीं तप करीत होते, सहस्र वर्षे तप केल्यावर कश्यपानें अदितीला पयोव्रत करण्यास सांगितलें, व दररोज चार लक्ष जप महामंत्राचा करण्यास सांगितले. त्याप्रमाणें अदितीनें तेरा दिवस व्रत केल्यावर कश्यपानें त्या बताची योग्यप्रकारें सांगता करून ब्राह्मणांना बोलाविलें व त्यांना भोजनदक्षणा वगैरे देऊन प्रसन्न केलें. त्या तिघांच्या तपानें व अदितीच्या व्रतामुळे भगवान् विष्णु प्रसन्न होऊन प्रत्यक्ष येऊन उभे राहिले. शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेल्या विष्णूला पाहून तिघांनींहि त्याला वंदन केलें. कश्यप हात जोडून विष्णूला ह्मणाला “हे नारायणा ! तुझ्यावांचून बळीचा नाश करणारा कोणीहि समर्थ दिसत नाही. या संकटाचें तूं आतां लवकर निवारण कर." इंद्र, देवास हात जोडून ह्मणाला, " हे विश्वव्यापक भगवंता, बळी माझी अमरावती घेऊन तो इंद्रपदाचा उपभोग घेत आहे; तें इंद्रपद आपणाकडे अक्षय्य रहावे ह्मणून आतां शंभर यज्ञ करीत आहे; तर हे देवाधिदेवा ! यावेळी माझ्या लज्जेचें संरक्षण करण्यास तुझ्यावांचून कोणीहि समर्थ नाही. " हे ऐकून तो गदाधर ह्मणाला, मी लवकरच अदितीचे पोटी जन्म घेऊन बळीचें हनन करीन. तुझी त्यासंबंधानें कांहींहि काळजी करूं नका. असे सांगून भगवंतानें इंद्र, कश्यप व अदिती यांनां मार्गस्थ केलें. २ गदासुराची कथा. जनमेजय ह्मणाला, "ऋषि ! भगवंतास गदाधर असें कां ह्मणतात, तें ऐक ण्याची माझी इच्छा आहे, तर ती हकीगत मला सांगावी. " वैशंपायन ऋषि राजाला ह्मणाला, "राजा ! पूर्वी लवणासुर या नांवाचा महा पराक्रमी असुर होता, त्याचा श्रीहरीनें नाश केला. त्याचा गद नांवाचा एक पुत्र होता. हा गद गर्भावस्थेत असतांनाच लवणासुराचा नाश झालेला असल्यामुळे त्याला आपल्या बापाची कांहींच माहिती नव्हती. तेव्हां त्यानें एके दिवशीं आईला बापाची माहिती विचारली; आई ह्मणाली; “ गदा ! तूं गर्भावस्थेत असतांनाच क्षीरसागरी राहणाऱ्या नारायणानें तुझ्या बापाला मारलें." हे आईच्या तोंडचे शब्द ऐकून गदराक्षसाला फार राग आला. तो ह्मणाला, " ज्या गोविं- दानें माझ्या बापाचा नाश केला, त्या गोविंदाचा मीही नाश करीन." असे झणून तो आपल्या आईची आज्ञा घेऊन घराच्या बाहेर पडला व एका घोर अरण्यांत जाऊन त्यानें शंकराच्या प्राप्तीसाठी हजार वर्षे धूम्रपान करून एकनिष्ठपणे महारुद्राची सेवा केली, तेव्हां शंकर त्यास प्रसन्न झाले व इच्छित वर माग झणाले. महादेव प्रसन्न झाल्यावर तो ह्यणाला, 86 हे महादेवा !