पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२रें] अध्याय ६ वा. म्याला भीतकराने, पळविले. दैत्यांपुढे कोणाचाच निभाव लागेना, तेव्हां राहिलेले सर्व देव इंद्राला आमचें रक्षण कर असें ह्मणूं लागले. तेव्हां इंद्र सर्व देवांनां आपल्या मांगे घालून बळीबरोबर युद्ध करण्यासाठी रणावर आला. इतक्यांत आकाशवाणी झाली कीं, " हे इंद्रा ! या बळीबरोबर तूं युद्ध करूं नकोस; तुला जय मिळणार नाहीं. : आकाशवाणी ऐकून सर्व देव विस्मित झाले. गुरूनहि आकाश वाणीप्रमाणेंच सर्वांना उपदेश केला, तेव्हां सर्व देव अमरावती सोडून देऊन जीवाच्या भीतीनें पळाले व कश्यपअदितीजवळ येऊन त्यांच्या आश्र- याला राहिले. देवांनी कश्यपाला सर्व हकीकत सांगितल्यावर कश्यप इंद्राला झणाला; "इंद्रा तूं आतां ब्रह्मदेवाकडे जाऊन त्याला विचार, ह्मणजे तो तुला योग्य सल्ला देईल.” कश्यपानें असें सांगितल्यावर इंद्रादि सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले, व ब्रह्मदेवास सर्व हकीकत सांगून पुढे कसे करावें, ह्मणून विचारूं लागले. तेव्हां ब्रह्मदेव झणाला, " इंद्रा ! बळीचें पारिपत्य करण्यास भगवान् शेषशाई नारायणावांचून कोणीहि समर्थ नाही, तर तुझी त्याचेकडे जाऊन भगवंताची स्तुति करा, झणजे भगवान् प्रसन्न होऊन तुमचें कार्य करील." ब्रह्मदेवानें असे सांगितल्यावर इंद्र, कश्यप वें अदिती यांनां बरोबर घेऊन क्षीरसागरीं गेला. अध्याय वा. १ वामनाची कथा. बळीनें इंद्राला घालवून त्याचे राज्य तो आनंदानें करूं लागला. त्यानें अमराव- ·तीचें उत्तम पालन केलें. अमरावतीच्या लोकांनांद्दि बळीच्या राज्यपद्धतीने मोठे सुख झाले. लोकांनी धर्ममार्गाने राहून निरंतर ईश्वर भजनांत असावें हाणून बळी फार मेहनत घेत असे. राजाची ती इच्छा पाहून लोकहि धर्मरत झाले. घरोघरी तुळशीची वृंदावनें झाली, जिकडे तिकडे सडासंमार्जन होऊं लागले, आणि ईश्वराच्या नावाचा गजर होऊं लागला, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा वगैरे सर्व बळीवर प्रसन्न असत. याप्रमाणे बळी अमरावतीचें राज्य करित असतां अमरा- बतीचा लाभ अक्षय्य व्हावा अशी त्यास इच्छा उत्पन्न झाली, व त्यासाठी कोणता प्रयत्न करावा हें त्यानें आपला गुरु शुक्राचार्य यास विचारलें. शुक्राचार्य झणाला, “राजा ! शंभर याग केले असतांना अमरावतीची अक्षय्य प्राप्ति होऊन इंद्र निःसत्व होतो." हे ऐकून राजाला शंभर यज्ञ करण्याची इच्छा झाली; त्यानें शुक्राचार्याला यागाची तयारी करण्यास सांगितले. शुक्राचार्यानें नर्मदेचे कांठीं यज्ञासाठी सुंदर